व्यसनांपासून दूर राहा, गुटखा खाऊ नका, दारू पिऊ नका. नायतर रोज टाकणार आणि म्हणणार बघा, अशा शब्दात अजित पवार यांनी तळीरामांना फटकारले.
कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही.

व्यसनांपासून दूर राहा, गुटखा खाऊ नका, दारू पिऊ नका. नायतर रोज टाकणार आणि म्हणणार बघा, अशा शब्दात अजित पवार यांनी तळीरामांना फटकारले.
कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही.
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाच्या सीटी स्कॅन विभागाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी तळीरामांना फटकारलं. तसेच कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्याचं आवाहनही केलं. आजार टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारा.
असंही त्यांनी सांगितलं व्यसनांपासून दूर राहा, गुटखा खाऊ नका, दारू पिऊ नका. नायतर रोज टाकणार आणि म्हणणार बघा, अशा शब्दात अजित पवार यांनी तळीरामांना फटकारले. सकाळी लवकर उठा. कोणतंही व्यसन करू नका. व्यसनं करशाल तर बरबाद व्हाल, असं अजित पवार म्हणाले.
मी फक्त जेवतानाच मास्क काढतो
कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळा. मास्क वापरा. मी फक्त जेवताना आणि पाणी पितानाच मास्क काढतो. काल सगळीकडे गेलो. पण मास्क काढला नाही, असं सांगतानाच तुम्हीही मास्क वापरा. हयगय करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.
माझ्यासारखी शिस्त पाळा
वैद्यकीय महाविद्यालयाला मदत करणारे अनेकजण उशीरा आलेत. आता माझं भाषण झाल्यावर तुम्ही लगेच उठू नका. नाहीतर म्हणाल झालं बाबाचं आणि निघताल. जरा थांबा. मी सगळ्यांचे सत्कार करणार आहे. जरा शिस्त पाळा माझ्यासारखी, असं अजित पवार यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.
तर विकास कामाचा निधी कोरोनासाठी द्यावा लागेल-
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, मास्क वापरालाच पाहिजे. मी फक्त पाणी पिताना, जेवन करतानाच मास्क काढतो. माझं अनुकरण तुम्ही करावे यासाठी मी मास्क सातत्याने वापरत आहे. तिसरी लाट आली की आम्हाला नकोनको होते. मी हे पोटतिडकीने ऐवढ्यासाठी सांगत आहे की, कोरोना वाढला की आम्हाला विकास कामांचा सगळा निधी कोरोना उपाययोजनांमध्ये खर्च करावा लागतो. शेवटी माणसाचा जीव वाचवणे हे प्रथम कर्त्यव्य आहे. आता लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सलग ७५ तास लसीकरण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी करण्यात आला. झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. शनिवारी पुणे येथील कोरोना आढावा बैठकीमध्ये देखील ‘हाऊस टू हाऊस’ लसीकरणाचा सर्व्हे तसेच लसीकरण करण्याच्या सुचना केल्या आहेत, अशी माहिती देखील