व्हीपीकेबीआयईटी बारामती, येथे विद्यार्थी संघटना (ITSA) यांच्या वतीने “जावा प्रोफेशनल कसे व्हावे आणि त्यामधील महत्वपूर्ण कॅरियर टिप्स” या विषयावर तज्ज्ञांचे मागर्दर्शन
नवीन कारखानदारीची तयारी कशी करावी किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये कामे करताना कोण कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात
व्हीपीकेबीआयईटी बारामती, येथे विद्यार्थी संघटना (ITSA) यांच्या वतीने “जावा प्रोफेशनल कसे व्हावे आणि त्यामधील महत्वपूर्ण कॅरियर टिप्स” या विषयावर तज्ज्ञांचे मागर्दर्शन
नवीन कारखानदारीची तयारी कशी करावी किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये कामे करताना कोण कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात
बारामती वार्तापत्र
महाविद्यालयात विद्यार्थी संघटना ITSA यांनी विद्यार्थ्यांसाठी “जावा प्रोफेशनल कसे व्हावे आणि त्यामधील महत्वपूर्ण कॅरियर टिप्स” या विषयावर तज्ज्ञांचे मागर्दर्शन आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक बीएनवाय मेलॉन, पुणेचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. राहुल बंडगर, हे लाभले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यानी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानांमध्ये जावा व्यावसायिक कसे व्हावे आणि सॉफ्टवेअर उद्योगात कसे सामील व्हावे याबद्दलचे त्यांचे जीवनातील अनुभव कथन केले.
तसेच नवीन कारखानदारीची तयारी कशी करावी किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये कामे करताना कोण कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात आणि त्यावर मात कशी करावी याविषयीचे सखोल मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर आणि आयटी विभाग प्रमुख डॉ. तृप्ती भंडारे, रजिस्ट्रार डॉ. राजवीर शास्री, आयक्यूएसी प्रमुख डॉ. एस .ए .टकले, सेंट्रल टीपीओ डॉ. विशाल कोरे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. चैतन्य कुलकर्णी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब पाटील, प्रा. सूरज कुंभार आदी मान्यवर प्राध्यापकांनी उपस्थिती नोंदवली होती.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या माहिती आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी शाखेतील प्रथम वर्ष ते चतुर्थ वर्ष या वर्गातील सर्व विद्यार्थी, तसेच महाविद्यालयातील माहिती आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी शाखेचे सर्व प्राध्यापक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
हा कार्यक्रम यशस्वी संपन्न होण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी शाखेच्या विभाग प्रमुख डॉ. तृप्ती भंडारे तसेच कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. प्रियांका कोकरे, माहिती आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना ITSA चे सर्व सदस्य महाविद्यालयातील माहिती आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी शाखेचे सर्व प्राध्यापक यांचे विशेष सहकार्य लाभले.