व्हीपीकेबीआयईटी, बारामती येथे अष्टाङ्ग अंतर्गत इंडियन नॉलेज सिस्टीम (आयकेएस) भारतीय चाली रिती, रूढी परंपरेचे ज्ञान व प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन
कार्यक्रमाध्ये विद्यार्थ्यांनी वेदकालीन वेशभूषा केल्या.
व्हीपीकेबीआयईटी, बारामती येथे अष्टाङ्ग अंतर्गत इंडियन नॉलेज सिस्टीम (आयकेएस) भारतीय चाली रिती, रूढी परंपरेचे ज्ञान व प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन
कार्यक्रमाध्ये विद्यार्थ्यांनी वेदकालीन वेशभूषा केल्या.
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या बि. टेक, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक आणि टेलिक्युनिकेशन या विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी विभागाने नोव्हे २०२४ रोजी अष्टाङ्ग अंतर्गत इंडियन नॉलेज सिस्टिम हा भारतीय चाली रिती, रूढी परंपरेचे ज्ञान व प्रकल्प प्रदर्शन हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांच्या शुभहस्ते व प्रमुख पाहुणे डॉ. निर्मल साहूजी व त्यांच्या पत्नी सौ. वैशाली साहूजी, तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेचे विभागप्रमुख डॉ. अनिल डिसले, डॉ. अनिल हिवरेकर, डॉ. पी. आर. चित्रगार, प्रा. गौरी भोईटे, प्रा. वर्षा सुरवसे आदींच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते दीपपूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाध्ये विद्यार्थ्यांनी वेदकालीन वेशभूषा केल्या.
या कार्यक्रमाचे प्रायोजक प्राचार्य शशिकांत चौधर व मयुरेश्वर डेव्हलपर्स हे होते.प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये इंडियन नॉलेज सिस्टिम्स (आयकेएस ) या विषयाचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करण्यात आल्याचे नमूद केले.
या अभ्यासक्रमामुळे या नवीन पिढीतील नव तरुणांना भारतीय रूढी परंपरा तसेच चालीरीती व प्राचीन काळात उपलब्ध असणारे वैद्यकीय ज्ञान, आयुर्वेदिक ज्ञान, वास्तुशास्त्र, वनस्पतीशास्त्र, तसेच गुरु शिष्य परंपरा व गुरुकुल पद्धती याची माहिती व्हावी यासाठी या अभ्यासक्रमाचा अंतर्भाव करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्राचीन रोबोटिक्स या विषयी राजा भोजराज यांनी निर्मित केलेले उपक्रम दाखविण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानातील एसीचे प्राचीन काळातील स्वरूप कसे होते हे समजावे यासाठी मडक्यांचा उपयोग करून त्याचे प्राचीन स्वरूप दाखविले. या कार्यक्रमांमध्ये भारतीय संस्कृती, तंत्रज्ञान, लोककला यांचा समावेश करण्यात आला होता. भारतीय संस्कृतीचे अत्यंत चांगले दर्शन या प्रदर्शनामध्ये घडले. विद्यार्थ्यांनी प्राचीन काळापासून आयुर्वेदात उपयुक्त असणारे वेगवेगळे वृक्ष, प्राचीन काळापासून चालत आलेले सागरी मार्ग, प्राचीन वास्तुशास्त्र, मुद्राशास्त्र, नाडीशास्त्र, त्याचप्रमाणे योगशास्त्र, प्राचीनकाळातील विद्यापीठे, प्राचीन शल्यचिकित्सा शास्त्र या सर्वांची भित्तिपत्रके तयार करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांना त्याची योग्य माहिती दिली.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा आपल्या विद्यार्थ्यांना भारतीय परंपरेचा अभ्यास व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये अग्निहोत्र पेटविण्यात आलं होतं त्यामुळे अत्यंत भक्तीमय आणि आनंदी वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विषय शिक्षिका कल्याणी कुलकर्णी याने केले.