शंभर टक्के नुकसान झालेले असताना पंचनाम्यात वेळ घालविण्यापेक्षा तत्काळ मदत द्यायला हवी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
शंभर टक्के नुकसान झालेले असताना पंचनाम्यात वेळ घालविण्यापेक्षा तत्काळ मदत द्यायला हवी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
बारामती वार्तापत्र
संकट अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. विरोधात असताना आणि आमच्यासोबत असताना शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची ते मागणी करत होते. आता ईश्वरानेच त्यांना शेतकऱ्यांना मदत देण्याची शक्ती दिली आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज त्यांनी बारामती तालुक्यातील उंडवडी येथे नुकसानग्रस्त शेतक-यांशी संवाद साधला, त्या नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्याने केंद्राच्या मदतीची वाट न पाहता तातडीची मदत द्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली
आमच्या काळात अतिवृष्टीनंतर पाच दिवसात आम्ही पंचनामे पुर्ण केले, जेथे पंचनामे होऊ शकले नाहीत, तेथे मोबाईलवर फोटो काढून टाकला तरी तो पंचनामा म्हणून ग्राह्य धरला होता, आता तर शंभर टक्के नुकसान झालेले असताना पंचनाम्यात वेळ घालविण्यापेक्षा तत्काळ व्यवस्था व्हायला हवी असे ते म्हणाले.
पंचनामे नको, तातडीने मदत द्या!
‘अतिवृष्टी, पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱयांना भरीव मदत करण्याची गरज आहे. केंद्राकडून मदत मिळविण्याचा आम्ही सर्व तो प्रयत्न करू. परंतु राज्यानेही भरीव मदत करणे गरजेचे आहे. आम्ही दौरे जाहीर करताच राज्य शासन खडबडून जागे झाले आहे. आम्हाला प्रत्येक शेतकर्यांच्या बांधावर जाणे जमणार नसले तरी शक्य आहे तेवढ्या व्यथा जाणून घेऊ. नुकसानीसाठी मोबाईलमध्ये काढलेला फोटो ग्राह्य धरत प्रत्येकाला मदत मिळेल, यासाठी आम्ही आग्रही राहू. प्रत्येक गोष्ट केंद्रावर टाकायची आणि आपण मात्र नामानिराळे राहायच, आपल जणू काही कामच नाही, ही जी प्रवृत्ती आहे ती योग्य नाही, अशी जोरदार टीकाही फडणवीस यांनी केली. ‘राज्याला राज्याची जबाबदारी घ्यावीच लागेल, ती झटकून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ ही मदत घोषित करावी, अशी मागणी त्यांनी केली. अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या शेतजमिनी खरडून वाहून गेल्या आहेत. रब्बी पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकर्यांना त्या कामासाठी एक हिस्सा का होईना राज्य शासनाने तातडीने मदत केली पाहिजे. पंचनाम्यांच्या भानगडीत अडकू नये,’ असंही ते म्हणाले.