शरद पवारांनी पंतप्रधानांशी कोणत्या मुद्द्यावर चर्चा ,10 मोठे मुद्दे
मोदींसोबत वीस ते पंचवीस मिनिटं चर्चा केली होती.
शरद पवारांनी पंतप्रधानांशी कोणत्या मुद्द्यावर चर्चा ,10 मोठे मुद्दे
मोदींसोबत वीस ते पंचवीस मिनिटं चर्चा केली होती.
नवी दिल्ली :प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी भेटीत नेमकी कोणत्या मुद्दयांवर चर्चा झाली, याची माहिती दिली आहे. प्रफुल्ल के. पटेल यांची लक्षद्वीपच्या प्रशासकपदी निवड झाल्यानंतर तिथं सुरू असलेल्या घडामोडींबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार यांनी राष्ट्रीय राजकारणावरही भाष्य केलं आहे.
‘लक्षद्वीपच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी.पी. देखील उपस्थित होते. यावेळी लक्षद्वीपच्या विविध मुद्यांवर चर्चा झाली’ असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच या भेटीदरम्यान, विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या प्रश्नावर चर्चा झाली असून नरेंद्र मोदी विचार करून योग्य निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. संजय राऊतांवरील कारवाई करण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केले.
10 मुद्दे शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील मोठे मुद्दे
- महाराष्ट्र विकास आघाडी सरकार 5 वर्ष टिकणार
- राज्याच्या मंत्रिमंडळात कोणतेही बदल नाहीत
- राज्यपालांनी 12 आमदारांवर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही
- 12 आमदारांच्या प्रश्नावर मोदी विचार करुन काय निर्णय घेतात ते बघुयात
- संजय राऊतांच्या कारवाईबाबत नरेंद्र मोदींना सांगितलं आहे
- नवाब मलिकांच्या कारवाईवर कोणतीही चर्चा मोदी भेटीमध्ये झाली नाही
- राज्यातील कारवायांबाबत मोदींसोबत चर्चा नाही
- राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपविरोधात एकत्र उभी आहे
- इतरांच्या सांगण्यावरुन भाजपसोबत राष्ट्रवादी मुळीच जाणार नाही
- मविआ सरकारला कोणताही धोका नाही, पुन्हा सत्तेत येऊ