राजकीय

शरद पवारांसाठी महादेव जानकर ढाल बनले,म्हणाले आंब्याच्या झाडालाच माणसे दगड मारतात

जी माणसे मास बेस लीडर असतात, त्यांच्यावर टीका होत

शरद पवारांसाठी महादेव जानकर ढाल बनले,म्हणाले आंब्याच्या झाडालाच माणसे दगड मारतात

जी माणसे मास बेस लीडर असतात, त्यांच्यावर टीका होत

बारामती वार्तापत्र

बारामती लाेकसभा मतदारसंघात काम करताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कठाेर टीका करणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना आता उपरती झाली आहे.

आंब्याच्या झाडालाच माणसे दगड मारतात. फळ नसलेल्या झाडाला कुणी दगडे मारत नाही. जी माणसे मास बेस लीडर असतात, त्यांच्यावर टीका होत असते, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( शरदचंद्र पवार ) ९ ऑगस्टला क्रांती दिनाचे औचित्य साधून ओबीसी मंडल यात्रा सुरू करण्यात आली आहे. ओबीसी यात्रेवर महायुतीतील नेत्यांकडून तसेच, सध्या ओबीसींसाठी लढत असलेले लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे सुद्धा शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना दिसतात.ओबीसी मंडल यात्रा जालना येथे आली असता भेट दिल्यानंतर जानकर हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

महादेव जानकर म्हणाले, “ज्या माणसाने समाजासाठी चांगले काम केले आहे, त्यांचे गुण गायले पाहिजेत. शरद पवार यांनी मंडल आयोगाबद्दल घेतलेली भूमिका जगाला माहिती आहे. व्ही. पी. सिंह, शरद यादव यांनी ओबीसींसाठी कष्ट घेतले आहे. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांचेही ओबीसींसाठी योगदान आहे. त्यात मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी महिला आणि ओबीसींबद्दल भूमिका घेतली आहे.”

महायुतीतील अनेक नेते, शरद पवार यांच्यावर टीका करतात. याबद्दल विचारल्यावर जानकर यांनी म्हटले, “मी कुणावरही टीका करण्याची गरज नाही. आपण आपली चांगली लाईन ओढत राहायचे. एकमेकांवर टीका केल्यावरून माणूस छोटा होत नाही. आंब्याच्या झाडालाच माणसे दगड मारतात. फळ नसलेल्या झाडाला कुणी दगडे मारत नाही. जी माणसे मास बेस लीडर असतात, त्यांच्यावर टीका होत असते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना दगडे मारण्यात आली. पण, भारताच्या इतिहाताची मालकीण सावित्रीबाई फुले झाल्या आहेत. त्यामुळे चांगल्या काम करणाऱ्यांवर टीका होत असते. मंडल आयोग यात्रा शरद पवार यांच्या पक्षाने काढली आहे. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.”

Related Articles

Back to top button