स्थानिक

शरद पवार आले बारामतीकरांच्या मदतीला; चारशेहून अधिक उपलब्ध केली रेमेडिसीवर इंजेक्शन

कोरोनाग्रस्त रुग्णांना रेमेडिसीवर चा होणार फायदा

शरद पवार आले बारामतीकरांच्या मदतीला; चारशेहून अधिक उपलब्ध केली रेमेडिसीवर इंजेक्शन

कोरोनाग्रस्त रुग्णांना रेमेडिसीवर चा होणार फायदा

बारामती वार्तापत्र

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या रेमेडिसीवरचा तुटवडा सर्वत्र आहे.अशातच राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार बारामतीकरांचा मदतीला धावून आले असून त्यांनी चारशेहून अधिक रेमेडिसीवर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिली आहेत.

वास्तविक पाहता पुणे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत बारामती तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाने हाहाकार माजवला असून दिवसेंदिवस अनेकांना जीव गमवावे लागत आहेत.तसेच रेमेडिसीवर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी धावपळ पहावयास मिळत होती अशातच शरद पवारांनी मोफत इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवडाभरापासून बारामती शहरासह तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना संक्रमित रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासत असल्याने बारामतीतील रुग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी नातेवाईकांना प्रचंड धावपळ करावी लागत होती. त्यातच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचेही बोलले जात होते. अशावेळी मोफत रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाल्याने रुग्ण व नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान रेमेडिसीवर इंजेक्शन बारामती नगरपरिषद येथे मोफत उपलब्ध केली असता ती घेण्यासाठी खूप मोठया प्रमाणावर गर्दी पहावयास मिळाली असून सदरील प्रशासनाकडून यावेळी नियोजनाचा अभाव दिसून आला.तसेच येथे एका कोरोनाग्रस्त रुग्णांने देखील इंजेक्शन घेण्यासाठी उपस्थिती लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!