राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने बारामतीमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
सदरच्या आक्षेपार्ह मजकूराचा स्क्रीन शॉट जाधव यांच्या व्हाट्सअप वर

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने बारामतीमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
.सदरच्या आक्षेपार्ह मजकूराचा स्क्रीन शॉट जाधव यांच्या व्हाट्सअप वर
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या बद्दल ट्विटर अकाऊंटद्वारे आक्षेपार्ह मजकूर लिहून तो प्रसारित केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बारामती नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव यांनी फिर्याद दिली आहे.याप्रकरणी वेदश्री@वेदश्री_१९ आणि राजे हर्षवर्धन शास्त्री या ट्विटर अकाउंट धारकांवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव व त्यांचा मित्र अजित कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. कदम हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. तसेच देश-विदेशातील राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घडामोडीचा पाठपुरावा घेत असतात. कदम हे आज ट्विटर वरील घडामोडी पाहत असताना त्यांना वेदश्री या ट्विटर अकाउंट वरून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे तसेच या मजकुराला राजे हर्षवर्धन शास्त्री या अकाऊंट वरून आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कदम यांनी सदरच्या आक्षेपार्ह मजकूराचा स्क्रीन शॉट जाधव यांच्या व्हाट्सअप वर पाठवला. त्यानंतर सदर स्क्रीनशॉर्ट्चा पुरावा सादर करत उपनगराध्यक्ष् अभिजित जाधव यांनी भारत देशात राजकीय तेढ व शत्रुत्व द्वेषाची भावना निर्माण करून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने ट्विटरवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे