शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी महत्त्वाची बैठक पार,मलिकांबाबत कोणता निर्णय?
भाजपने ज्या प्रकारे सरकारी तपास यंत्रणाचा वापर केला आहे.
मुंबई : प्रतिनिधी
नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर ते नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामाशक्यता होती. पण, शरद पवार यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यामुळे मलिक हे मंत्रिपदी कायम राहणार आहे.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने ज्या प्रकारे सरकारी तपास यंत्रणाचा वापर केला आहे. त्याला चोख उत्तर देण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहे.
या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे असे प्रमुख नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे देखील शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय.