शहर व ग्रामीण भागात एंटीजन तपासणी सुरू
एकूण 923 एंटीजन तपासणी करण्यात आल्या यामध्ये 13 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून
शहर व ग्रामीण भागात एंटीजन तपासणी सुरू
एकूण 923 एंटीजन तपासणी करण्यात आल्या यामध्ये 13 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यामधील ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आज सकाळी 10.00 वाजता पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत शहर व ग्रामीण भागात घरोघरी जावून एंटीजन तपासणी करण्यात आली .
या तपासणी कॅम्पपूर्वी संबंधित गावातील समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनी योग्य ते नियोजन करुन जास्तीत जास्त लोकांची तपासणी करून घ्यावी. तसेच संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी,सरपंच यांचे मार्फत पोलिस यंत्रणेला कळविण्यात यावे व त्यांची मदत अन्टीजन कॅम्प करीता घ्यावी, अशा सूचना देखील आरोग्य अधिकारी यांनी दिल्या होत्या. स्थानिक लोक प्रतिनिधी यांचा देखील सहभाग घेऊन जास्तीत जास्त तपासणी करून घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले होते.
सदरचे तपासणी शिबीर दंडवाडी , जैनकवाडी, घाडगेवाडी, चोपडज, जळगाव सुपे, लाटे माळवाडी, डोर्लेवाडी, आर.एस.सुपा, बारामती शहर सुपरस्प्रेडर, जीएमसी सीसीसी या ठिकाणी राबविण्यात आले. यामध्ये दंडवाडी 105 , घाटगेवाडी 57, जैनकवाडी 105, चोपडज 39, जीएमसी सीसीसी 141, बारामती शहर सुपरस्प्रेडर 220 इतक्या तपासण्या करण्यात आल्या.या ठिकाणी एकही पॉझिटिव्ह रूग्ण मिळाला नाही. तसेच जळगाव सुपे 121 तपासणी मध्ये 06, लाटे माळवाडी मध्ये 116 तपासणीमध्ये 05, आर.एस.सुपा 10 तपासणीमध्ये 01, डोर्लेवाडीमध्ये 09 तपासणीमध्ये 01, अशा शहर आणि ग्रामीण भागामध्ये एकूण 923 एंटीजन तपासणी करण्यात आल्या यामध्ये 13 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले, असे पंचायत समिती आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.