शहीद जवान विरपत्नी ,वीर माता व विधवा चा सन्मान
ओटी भरून ,वाण देऊन हळद कुंकू संपन्न
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील शहीद जवान यांच्या वीर पत्नी, वीर माता आणि विधवा महिलांना वाण देऊन ,औक्षण करून, सोनेरी सन्मान करून मकर संक्रांत निमित्त हळद-कुंकवाचा कार्यक्रम शुक्रवार ३१ जानेवरी रोजी संपन्न झाला.
अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती महिला शाखा यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी जयहिंद फाऊंडेशन जिल्हा अध्यक्षा स्नेहलता देशमुख ,अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा अध्यक्षा ॲड प्रियंका काटे, पाटील तालुका अध्यक्षा ॲड सुप्रिया बर्गे, शहर अध्यक्षा अर्चना सातव ,ॲड.विणा फडतरे, स्नेहल सातव नम्रता ढमाले, ज्योती जाधव मनिषा शिंदे ,वैशाली सावंत,कल्पना माने,,राजश्री परजणे,ॲड अश्विनी शिंदे,सीमा सातव, प्रियंका जराड, सुचेता ढवाण , धनश्री देसाई,राणी भापकर, आदी मान्यवर महिला व तालुक्यातील १२०० महिला सहभागी झाल्या होत्या.
सामाजिक भान व जाण ठेवत समाज्यातील खरे हिरो सीमेवरील जवान असून त्यांचा आदर्श नवीन पिढीला मिळावा व सामाजिक एकोपा वाढीस लागावा म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संयोजक पदाधिकारी महिलांनी सांगितले.
वीर पत्नी,वीर माता व विधवा महिलांचा सन्मान करून समाज्यातील त्यांचे स्थान,त्यांचा त्याग किती महत्वाचे आहे हे दाखवून दिले व गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी सदर उपक्रम आदर्शवत असून वीर जवानांच्या कार्याचा गौरव म्हणून प्रत्येक ठिकाणी असे कार्यक्रम व्याहवेत अशी अपेक्षा जयहिंद फाऊंडेशन जिल्हा अध्यक्षा स्नेहलता देशमुख यांनी व्यक्त केली.
पाटावर बसवून, औषण करून, संस्कृती प्रमाणे वाण देऊन सन्मान केल्यावर अनेक महिला भावनिक झाल्या व व डोळ्यातील अश्रूंना वाटा रिकाम्या करून दिल्या.