शारदाबाई पवार विद्यानिकेतन येथील धनश्री मुंढे ची ‘युविका २०२५’ साठी निवड!,महाराष्ट्रातील केवळ १२ विद्यार्थ्यांचा समावेश!
"युविका २०२५" साठी निवड

शारदाबाई पवार विद्यानिकेतन येथील धनश्री मुंढे ची ‘युविका २०२५’ साठी निवड!,महाराष्ट्रातील केवळ १२ विद्यार्थ्यांचा समावेश!
“युविका २०२५” साठी निवड
बारामती वार्तापत्र
शारदानगर (ता.बारामती) येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन येथील इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेल्या कु.धनश्री सूर्यकांत मुंढे हिची निवड भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या “युविका २०२५” साठी झाली आहे.
गणित-विज्ञान विषयातील ऑलिम्पियाड स्पर्धांमधील यश, तसेच अटल मॅरेथॉनमधील तिची कल्पना, इस्रोने घेतलेल्या प्रश्नमंजुषा तसेच क्रीडा स्पर्धेमधील उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे वरील निवड झाल्याचे सांगण्यात आले. अहमदाबाद येथे १८ मे ते ३० मे २०२५ वरील शिबीर होणार आहे. महाराष्ट्रातून १२ विद्यार्थ्यांची या शिबिरासाठी निवड झाली आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट-बारामती संचलित शारदाबाई पवार विद्या निकेतन ही संस्था शैक्षणिक उपक्रमात नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असते. अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान आणि त्यांच्या उपयोगाविषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी ही संस्था सातत्याने प्रयत्न करीत आहे.
त्यामुळेच महाराष्ट्रातील १२ विद्यार्थ्य़ांमध्ये कु.धनश्री सूर्यकांत मुंढे हिची निवड भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या “युविका २०२५” साठी झाली आहे. अहमदाबाद येथे १८ मे ते ३० मे २०२५ या कालावधीत “युविका २०२५” हे निवासी शिबीर होणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना व्याख्याने, प्रात्यक्षिके, प्रयोगशाळा भेटी, तसेच संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञांशी थेट व संवाद असे विविध उपक्रम अनुभवता येणार आहेत.
दरम्यान, शारदानगर येथील निवड झालेल्या धनश्री हिला लहानपणापासूनच विज्ञानाची गोडी आहे. तिने अनेक विज्ञान प्रदर्शनामध्ये, तसेच उन्हाळी शिबिरे आणि विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. धनश्री हिने आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प सादरीकरण केल्याचीही नोंद आहे.
गणित-विज्ञान विषयातील ऑलिम्पियाड स्पर्धांमधील यश, तसेच अटल मॅरेथॉनमधील तिची कल्पना, इस्रोने घेतलेल्या प्रश्नमंजुषा तसेच क्रीडा स्पर्धेमधील उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या “युविका २०२५” साठी निवड झाली. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, समन्वयक तनपुरे, गार्गी दत्ता यांनी धनश्री मुंढे हिचे अभिनंदन केले.