शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर तालुका दंडाधिकारी यांची कारवाई
हॉटेल्स सात दिवसांसाठी सील
शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर तालुका दंडाधिकारी यांची कारवाई
हॉटेल्स सात दिवसांसाठी सील
इंदापूर : प्रतिनिधी
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून निर्बंध घालण्यात आलेले असताना शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून हॉटेलमध्ये पाच पेक्षा अधिक लोकांची गर्दी करून शासनाच्या आदेशाचा भंग केल्याने संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून पुढील सात दिवसांकरिता त्यांची हॉटेल्स सील करण्यात आली आहेत.
सदरील कारवाई तालुका दंडाधिकारी तथा इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याकडून करण्यात आली आहे. यामध्ये उदय सदाशिव देशपांडे रा.अंबिकानगर इंदापूर यांचे पायल सर्कल सोलापूर रोड बायपास येथील देशपांडे व्हेज हॉटेल, विकी चंद्रकांत शिंदे रा.बिजवडी ता.इंदापूर यांचे पुणे सोलापूर हायवे लगत सरडेवाडी येथील हॉटेल धनश्री , अमोल नारायण माने रा.तरटगांव ता.इंदापूर यांचे पुणे-सोलापूर हायवे लगत हिंगणगाव येथील हॉटेल कोळीवाडा, तानाजी धोंडिबा देवकर रा.बाबा चौक ता.इंदापूर यांचे शहा पाटी येथील हॉटेल रायगड , पोकराम बुद्धाराम सागर रा.हिंगणगाव ता.इंदापूर यांचे पुणे-सोलापूर हायवे लगत हिंगणगाव येथील हॉटेल राजस्थानी ढाबा,सूर्यकांत दगडू जाधव रा.४० फुटी रोड, इंदापूर यांचे बाबा चौक,इंदापूर येथील गिरजाई हॉटेल या आस्थापना कारवाईपासून सात दिवसांसाठी सीलबंद करण्यात आल्या आहेत.