शासनाच्या विविध योजना चा लाभ घेऊन उच्च शिक्षित व्हा: राजेंद्र कोंढरे
दौंड, इंदापूर,पुरंदर,चे शहर,तालुका अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थितीत
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2025/02/5242448f-9bd9-49db-a2b8-04c6ea6a61b8-780x470.jpg)
शासनाच्या विविध योजना चा लाभ घेऊन उच्च शिक्षित व्हा: राजेंद्र कोंढरे
दौंड, इंदापूर,पुरंदर,चे शहर,तालुका अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थितीत
बारामती वार्तापत्र
शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांसाठी असून त्याचा लाभ घ्या व उच्चशिक्षित व्हा तसेच व्यवसाय करताना अचूक माहिती घेऊनच कर्जे प्रकरण करा व वेळेत परतफेड करा व पुन्हा नव्या जोमाने व्यवसाय करा असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र जी कोंढरे यांनी केले रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय मराठा महासंघ यांचे दौंड इंदापूर पुरंदर व बारामती येथील पदाधिकारी यांची संवाद बैठक संपन्न झाली.
या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे मार्गदर्शन करीत होते. या प्रसंगी संयुक्त सरचिटणीस गुलाब दादा गायकवाड व आदिनाथ थोरात नंदू काका जगताप व ऍड प्रियंका काटे, ऍड सुप्रिया बर्गे आणि इतर दौंड, इंदापूर,पुरंदर,चे शहर,तालुका अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थितीत होते.
या प्रसंगी राजेंद्र कोंढरे बोलत होते यामध्ये २१ सुत्री कार्यक्रम करण्याचा एजेंडा ची माहिती देऊन उद्योग व्यवसाय या बदल राजेंद्र कोंढरे यांनी माहिती दिली. शिक्षण घेतल्यावर शासकीय नौकरी मिळेल किंवा नाही या बदल वेगळी बाजू आहे परंतु उद्योग व्यवसाय मध्ये मराठा तरुणांनी उतरून चिकाटीने यश मिळवावे असेही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्ताविक तालुकाध्यक्ष संभाजी माने यांनी केले तर आभार शहर प्रमुख सौ .अर्चनाताई सातव यांनी केले.