शिंदे गटाचा बडा नेता अडचणीत; ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची बारामतीत मागणी…….
खाटीक समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य

शिंदे गटाचा बडा नेता अडचणीत; ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची बारामतीत मागणी…….
खाटीक समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य
बारामती वार्तापत्र
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कैलास गोरंट्याल आणि शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले आहेत.
दोन्ही नेत्यांच्या वादादरम्यान शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी टीका करताना खाटीक समाजाबद्दल चुकीचं वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खोतकर यांच्या वक्तव्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.
या संदर्भात बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, अर्जुन पंडीतराव खोतकर यांची एका माध्यमावर मुलाखत सुरु असताना त्यांनी खाटिक समाजाविषयी लोकांमध्ये द्वेष व तिरस्काराची भावना निर्माण होईल, या उद्देशाने हे वक्तव्य केलेले आहे.
मी माहिती घेतली असता सदर व्यक्ती हे विधानसभेचे सदस्य असून लोकप्रतिनिधी असल्याचे समजले. समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य त्यांनी केलेले आहे, त्यांनी कोणतीही माहिती न घेता हे वक्तव्य केले आहे.
ते लोकप्रतिनिधी व विधानसभेचे सदस्य असल्याने त्यांनी जबाबदारीने वक्तव्य करणे गरजेचे असताना त्यांनी द्वेष निर्माण होईल अशी भाषा वापरल्याने त्यांच्याविरुध्द अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.