शैक्षणिक

शिक्षणाची ओढ, मदतीची जोड! मेडद येथे ११ व्या वर्षीही स्कूल बॅग वाटप उपक्रम उत्साहात

स्व. अशोककाका व स्व. धनंजय (भाऊ) देशमुख वतीने मेडद येथे ११ व्या वर्षीही स्कूल बॅग वाटप उपक्रम उत्साहात

शिक्षणाची ओढ, मदतीची जोड! मेडद येथे ११ व्या वर्षीही स्कूल बॅग वाटप उपक्रम उत्साहात

स्व. अशोककाका व स्व. धनंजय (भाऊ) देशमुख वतीने मेडद येथे ११ व्या वर्षीही स्कूल बॅग वाटप उपक्रम उत्साहात

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील मेडद येथील जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम पार पडला.

स्व. धनंजय (भाऊ) देशमुख मेमोरियल ट्रस्टच्या वतीने स्व. अशोककाका देशमुख आणि स्व. धनंजय (भाऊ) देशमुख यांच्या स्मरणार्थ गेल्या ११ वर्षांपासून सुरू असलेला स्कूल बॅग वाटप कार्यक्रम यंदाही उत्साहात आयोजित करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. राजे ग्रुप बारामती आणि शिवप्रतिष्ठान मेडद यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहताना दिसला.

“शिक्षणापासून एकही मूल वंचित राहू नये” या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा ट्रस्टचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनांची उपलब्धता होत असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मोठा आधार मिळत आहे.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो, असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आयोजकांनाही पुढील काळात अधिक जोमाने सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगण्यात आले.

या वेळी ट्रस्टचे पदाधिकारी, शिवप्रतिष्ठान व राजे ग्रुपचे सदस्य, शाळेचे शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ट्रस्ट सदैव तत्पर राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Back to top button