
शिक्षण घेताना अडचणी चा जप नको : डॉ. अरुण अडसूळ
लडकत स्कुल मध्ये शिक्षक दिन साजरा
बारामती वार्तापत्र
शिक्षण घेत असताना गरीबीचा जप करू नका. परिस्थिती कधीही अडथळा ठरू नये. मेहनत, जिद्द आणि चिकाटीने ज्ञानार्जन केले तर यश नक्की मिळते,अडचणींचा जप करू नका असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी केले.
५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना डॉ अरुण अडसूळ मार्गदर्शन करत होते.
प्रसंगी संस्थेचे संचालक नामदेव लडकत व गणेश लडकत, संचालिका शुभांगी लडकत व प्रियांका लडकत, प्राचार्य रामचंद्र वाघ, प्रफुल्ल आखाडे, तानाजी गवळी आदी मान्यवर उपस्तीत होते.
मायकल फेरेडे यांनी गरीबी असूनही ‘इलेक्ट्रिक मोटर’चा शोध लावला, मेरी क्युरी यांनी कठीण परिस्थितीत पोलोनियमचा शोध घेऊन नोबेल पारितोषिक पटकावले. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन राष्ट्राचे शिरपेच गौरवाने उंचावले. स्टिफन हॉकिंग यांनी गंभीर आजार असूनही विश्वनिर्मितीवर संशोधन करून नवे ज्ञान जगासमोर ठेवले असल्याचे डॉ अरुण अडसूळ यांनी सांगितले.
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवना विषयी माहिती व शिक्षक दिनाचे महत्व संचालक नामदेव लडकत यांनी सांगितले.
सूत्रसंचालन मीना गोळे यांनी केले तर आभार अनिल काशिद यांनी मानले.