शिखर शिंगणापूरची यात्रेनिमित्त यंदा “हर हर महादेवाचा गजर” कानावर पडणार पडणार..
नवमी दशमीला कोल्हापूर,सांगली, सातारा, कर्नाटक येथील भाविक दर्शनासाठी येतात.

शिखर शिंगणापूरची यात्रेनिमित्त यंदा “हर हर महादेवाचा गजर” कानावर पडणार पडणार..
नवमी दशमीला कोल्हापूर,सांगली, सातारा, कर्नाटक येथील भाविक दर्शनासाठी येतात.
बारामती वार्तापत्र
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानल्या जाणऱ्या शिखर शिंगणापूरची यात्रा यंदा होणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी गावोगावी शंभो महादेवाच्या कावडीची उभारणी केली जाते. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी, झारगडवाडी येथे गुढी पाडव्या दिवशी ग्राम प्रदक्षिणा घालत कावडीची उभारणी करण्यात आली. गुडीपाव्यापासून पाचव्या दिवशी शिव पार्वतीच्या हळदीचा कार्यक्रम होऊन यात्रेस प्रारंभ होतो.
नवमी दशमीला कोल्हापूर,सांगली, सातारा, कर्नाटक येथील भाविक दर्शनासाठी येतात. पुणे जिल्यातील मानाच्या कावडी कऱ्हानदीचे पवित्र जल घेऊन मुंगी घाटातून अवघड चढण पार करीत शिंगणापूर मध्ये दाखल होतात. मुंगी घाटाचा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होत शिखर शिंगणापूर मध्ये होत असते दोन वर्षानंतर यंदा डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण महाराष्ट्र आणि इतर राज्यातील भाविकांना पहायला मिळणार आहे.