शिरूर तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या 2 कोटी 31 लाख चोरणारे दरोडेखोरांना मुद्देमालासह अटक
पिस्तुलचा धाक दाखवीत जीवे मारण्याची धमकी दिली. आणि दोन कोटींचा ऐवज लुटला.
शिरूर तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या 2 कोटी 31 लाख चोरणारे दरोडेखोरांना मुद्देमालासह अटक
पिस्तुलचा धाक दाखवीत जीवे मारण्याची धमकी दिली. आणि दोन कोटींचा ऐवज लुटला.
क्राईम;बारामती वार्तापत्र
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेवर 21 ऑक्टोबर दुपारी दीड वाजता सुमारास दरोडा पडला होता. भरदिवसा रिव्हॉल्व्हर चा धाक दाखवत बँक कर्मचाऱ्यांना मारहाण करत पाच दरोडेखोरांनी बँकेवर दरोडा टाकून २ कोटी किमतीचे सोने व ३१ लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरली. या प्रकरणी पोलिसांनी 5 दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.
पिस्तुलचा धाक दाखवीत लुटली होती बँक
पिंपरखेडच येथे २१ ऑक्टोबरला दुपारी पाच दरोडेखोर हातात रिव्हॉल्व्हर घेऊन महाराष्ट्र बँकेत घुसले. एक जण दरवाजामध्ये थांबला तर चौघे आत केबिनमधे शिरले. त्यांनी मॅनेजर व रोखपाल यांना पिस्तुलचा धाक दाखवीत जीवे मारण्याची धमकी दिली. आणि लॉकरच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर तेथील सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने व 31 लाख रुपये रोख असा दोन कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज पोत्यात भरून पलायन केले.
या गाडीवर प्रेसचा मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यांनी काळे जर्किंग डोक्यापर्यंत पूर्ण व तोंडाला मास्क लावले होते.
आरोपींना मुद्देमालासह अटक
ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस पथकाने शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व टीमने प्रचाराचे सूत्र हातात घेतले. पुणे व नगर जिल्ह्यात तपास करताना आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य सूत्रधार हा आणि गुन्ह्यातील सराईत आरोपी असून निघोज तालुका पारनेर येथील आहे .या मधील आरोपी वाळू तस्करी व जुगारी असून आणि गुन्ह्याची नोंद त्यांच्या नावावर असल्याचे समजते.