स्थानिक

शिर्सुफळ गावात गरोदर महिलांसाठी मोफत खाजगी रुग्णवाहिका सुरू

जो पर्यंत सरकारी रुग्णवाहिका या ठिकाणी चालू होत नाही तो पर्यंत

शिर्सुफळ गावात गरोदर महिलांसाठी मोफत खाजगी रुग्णवाहिका सुरू

जो पर्यंत सरकारी रुग्णवाहिका या ठिकाणी चालू होत नाही तो पर्यंत

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गावातील गरजू महिलांच्या मागणीवरून युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार शिंदे यांनी आपल्या स्वखर्चातून तुषार भाऊ शिंदे युवा मंचच्या वतीने गरोदर महिलांसाठी मोफत रुग्णवाहिका सुरू केली आहे. दरम्यान या सामाजिक कार्याचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे.

जो पर्यंत सरकारी रुग्णवाहिका या ठिकाणी चालू होत नाही तो पर्यंत खाजगी रुग्ण रुग्णवाहिका मोफत दिली जाणार असल्याचे तुषार शिंदे यांनी सांगितले. या दरम्यान मोफत रुग्ण रुग्णवाहिकेचे उद्घाटन शिर्सुफळ गावचे सरपंच आप्पासाहेब आटोळे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी उपस्थित विश्वास आटोळे , तुषार शिंदे, डॉ. चौधरी, डॉ शिनगारे, अँड राजकिरण शिंदे, विजू मोरे, अशोक मोरे, उमेश जगताप, राहुल जगताप, प्रमोद बोराटे, संतोष घोडे, महेश शिंदे, महेश म्हेत्रे, बाळासाहेब म्हेत्रे, अभिषेक भडलकर , अप्पासाहेब शिंदे, आरमान शेख, दत्ता शिंदे व सर्व तुषार भाऊ शिंदे युवा मंच आणि समस्त ग्रामपंचायत, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button