
शिर्सूफळजवळ बारामती तालुका पोलिसांची मोटार थेट विद्युत खांबावर
सीट बेल्टचा वापर केला नव्हता
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका पोलिस ठाण्याकडील शासकीय वाहन थेट विद्युत खांबावर जावून धडकल्याची घटना शिर्सूफळ (ता. बारामती) गावाजवळ घडली.
शिर्सूफळनजीक साबळेवाडी येथे एका ज्येष्ठाने गळफास घेतल्याची खबर पोलिस ठाण्याला मिळाली होती.
त्यानुसार काही पोलिस कर्मचारी शासकीय मोटारीने घटनास्थळाकडे निघाले होते. वाटेत शिर्सूफळमध्ये मुरुमाने भरलेली हायवा गाडी पोलिसांच्या नजरेस पडली. त्यांनी हायवा चालकाला विचारणा केली.
त्याला हायवा गाडीतून उतरवून घेत पोलिसांच्या मोटारीत बसविण्यात आले. तेथून पुढे जात असताना सौर उर्जा प्रकल्पा शेजारील एका वळणावर पोलिस चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे पोलिसांचे वाहन थेट विद्युत खांबावर जावून आदळले. या घटनेत मोटारीत घेतलेला हायवाचालक सुद्धा जखमी झाला. शिवाय पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे पोलिसांनी सीट बेल्टचा वापर केला नव्हता, अशीही माहिती पुढे आली आहे.