
शिवजयंती निमित्त ऐतिहासिक विषयांवर विविध स्पर्धा
लहान मोठे 360 स्पर्धकांनी सहभाग
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील राजे ग्रुप च्या वतीने शिवजयंती निमित्त चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
चित्रकला व निबंध स्पर्धा शुभारंभ राजे ग्रुप महिला मंडळातील सदस्यांनी केला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच अनेक आधारित विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये लहान मोठे 360 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
महाराष्ट्रातील इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी ऐतिहासिक वास्तू, इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज मुख्य उद्देश ठेऊन आयोजित केलेली चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा उत्साहात पार पडली यात राजे ग्रुप बारामती, राजे ग्रुप महिला मंडळातील लहान मोठ्या सदस्यांनी सहकार्य केल आपला वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या स्पर्धेतून केले आहे.