शिवजयंती निमित्त चार मंडळांना दिलेले ध्वनि परवाना व इतर निर्बंधाचे उल्लंघन केल्याबद्दल चार मंडळावर कारवाई
मुंबई पोलीस अॅक्ट कलम 33 (r) (w) सह 131(अ) अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे.
शिवजयंती निमित्त चार मंडळांना दिलेले ध्वनि परवाना व इतर निर्बंधाचे उल्लंघन केल्याबद्दल चार मंडळावर कारवाई
मुंबई पोलीस अॅक्ट कलम 33 (r) (w) सह 131(अ) अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरामध्ये दिनांक 21 मार्च रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्व मंडळांना बोलून कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण होणार नाही व नियंत्रित आवाज ठेवण्याबाबत लेखी व तोंडी सूचना वेळोवेळी दिलेल्या होत्या. बरेच मंडळ त्याचे पालन सुद्धा केले.
परंतु काही मंडळांनी विशेष करून भीगवन चौकाच्या आसपास. आवाजाची तीव्रता अतिशय वाढवून पोलिसांनी घालून दिलेले निर्बंध उल्लंघन करून अतिशय कर्कश्य अशा आवाजामध्ये स्पीकर सिस्टीम चालू ठेवली.
म्हणून त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम प्रमाणे कारवाई करून माननीय न्यायालयात खटले पाठवण्यात आलेले आहेत. काही मंडळाने तर परवानगी न घेताच स्टेज लावलेले होते. पुढील वर्षी या मंडळांना परवानगी देताना त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा या ठिकाणी विचार करूनच परवाना दिला जाणार आहे.
1) शिव योद्धा ग्रुप चांदणी चौक बारामती आयोजक रोहित राजेंद्र दामोदर या मंडळामुळे शेजारी असलेल्या दुकानातील आवाजामुळे काचा फुटून दुकानदाराचे नुकसान झाले.
2) जगदंब प्रतिष्ठान भिगवन चौक आयोजक विवेक देविदास साळुंखे या मंडळाला स्पीकर परवाना दिला असतानासुद्धा त्यांनी डीजेची गाडी आणून विनापरवाना उभी केली.
3) नो फायर ग्रुप भिगवन चौक आयोजक सुरज किर्वे या मंडळाने पोलीस स्टेशन कडून कोणत्याही प्रकारचे परवानगी न घेता मोठ्या आवाजात साऊंड लावली.
4) के ग्रुप प्रतिष्ठान भिगवन चौक आयोजक युवराज नंदू काळे व डि. जे मालक यांनी अतिशय मोठे स्टेज रस्त्याला अडथळा निर्माण होईल अशा रीतीने लावले व आवाजाची तीव्रता वाढवली.
या सर्व मंडळांवर मुंबई पोलीस अॅक्ट कलम 33 (r) (w) सह 131(अ) अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढील काळात सुद्धा सर्वांनी सर्व जयंती उत्साहात साजरा करावा परंतु अतिउत्साह केल्यास निश्चितपणे कारवाई करण्यात येईल.