जेजुरी

शिवजयंती निमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट

मंदिरासमोर करण्यात आलं शिवकालीन युद्ध कलेचे प्रात्यक्षिक

शिवजयंती निमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट

मंदिरासमोर करण्यात आलं शिवकालीन युद्ध कलेचे प्रात्यक्षिक

बारामती वार्तापत्र

अवघ्या महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज शिवजयंती मोठा उत्साहात साजरी करण्यात येतेय… शिवजयंती निमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिर मधील गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलीय…

त्याचबरोबर छत्रपतीं शिवाजी राजे आणि शहाजीराजे या पिता पुत्राच्या भेटीचे शिल्प असलेल्या पुतळ्याचं पूजन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर अडीच पायरीच पूजन करण्यात आले…

शिवजयंतीनिमित्त आज खंडोबाच्या मंदिरा बाहेर असलेल्या कासवावर तलवारबाजी, लाटी-काटी या शिवकालीन युद्ध केलेच प्रात्यक्षिक करण्यात आले. छत्रपतींच्या काळातील युद्ध कला समाजासमोर आणण्यासाठी हे प्रात्यक्षिक करण्यात आल्याचं देवस्थानच्यावतीने सांगण्यात आलं…

आजच्या कार्यक्रमाला जेजुरी नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांची विशेष उपस्थिती होती.

Back to top button