शिवदीप नर्सिंग होमच्या माध्यमातून इंदापूर मध्ये सुरु होतंय आय.व्ही.एफ. सेंटर
शिवदीप नर्सिंग होमच्या माध्यमातून इंदापूर मध्ये सुरु होतंय आय.व्ही.एफ. सेंटर
शिवदीप नर्सिंग होमच्या माध्यमातून इंदापूर मध्ये सुरु होतंय आय.व्ही.एफ. सेंटर
अद्यावत तंत्रज्ञान युक्त व सुसज्ज सेंटरचे शनिवारी उद्घाटन
इंदापूर : प्रतिनिधी
शिवदीप नर्सिंग होमच्या १५ वर्षांच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर त्यांच्या माध्यमातून आत्ता अद्यावत तंत्रज्ञान युक्त व सुसज्ज असे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरु होत आहे.शनिवारी (दि.२) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन होणार आहे.
जे कपल्स नैसर्गिकरित्या आई वडील होऊ शकत नाहीत ते आय.व्ही.एफ ट्रिटमेंटचा आधार घेऊन आई वडील बनण्याचे सुख मिळवू शकतात.ही वंधत्व निवारणावरील सर्वात उत्तम आणि आधुनिक उपचार पद्धत आहे. अपत्यहीन वंधत्व असलेल्या जोडप्यांना या आधुनिक पद्धतीने योग्य उपचार घेता यावेत या उद्देशाने सेंटर सुरू करत असल्याचे डॉ. शिवाजीराव खबाले व डॉ.दिपाली खबाले यांनी सांगितले.
इंदापूर शहरातील शिवदीप नर्सिंग होम जुना कचेरी रोड, बारामती बँकेच्या जवळ सदरील सेंटरची इमारत दिमाखात उभी असून या ठिकाणी आय.व्ही.एफ. च्या माध्यमातून आपत्यहीन जोडप्यांना मातृत्वाचा आनंद प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने अद्यावत तंत्रज्ञान युक्त व सुसज्ज सेंटर सुरु होत आहे.