पिण्याच्या पाण्यासाठी निमगांव केतकी येथील महिला काढणार हंडा मोर्चा
गेले सात दिवसापासून पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक

पिण्याच्या पाण्यासाठी निमगांव केतकी येथील महिला काढणार हंडा मोर्चा
गेले सात दिवसापासून पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक
निलेश भोंग ; बारााामती वाार्तापत्र
निमगाव केतकी येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने निमगाव केतकी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मिसाळ यांनी निवेदन देऊन दि. 3 जुलै रोजी सकाळी दहा वाजता मातंग वस्ती ते ग्रामपंचायत महिलांचा हंडा मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.
मिसाळ यांनी निवेदनात सांगितले आहे की निमगाव केतकी ग्रामपंचायतीकडून फक्त गोरगरीब सामान्य नागरिकांकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुल केली जात असून निमगांव केतकी हद्दीत जनावरांचे खाद्य तयार करण्याची कंपनी असून या कंपनीकडे लाखो रुपयांचा कर बाकी असताना फक्त गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी साठी टारगेट केले जात आहे. असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला गेला.
पाणी प्रश्नावरून निमगांव केतकी ग्रामपंचायतीचा गलथान कारभार समोर आला असून सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष घालून बंद असणाऱ्या नळपाणी पुरवठा योजना त्वरित चालू करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.