शिवराज्य शेतकरी विकास मंच तर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर संपन्न
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवराज्य शेतकरी विकास मंच तर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर संपन्न
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
इंदापूर : प्रतिनिधी
शिवराज्य शेतकरी विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने बुधवारी (दि.२) आयोजित करण्यात आलेल्या मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.
सध्याच्या घडीला कोरोना नियंत्रणात असला तरी कोरोना पासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम गतिमान करण्याच्या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवराज्य शेतकरी विकास मंच चे प्रदेशाध्यक्ष जावेद शेख यांनी दिली.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज्य शेतकरी विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष जावेद शेख, प्रदेश उपाध्यक्ष वैभव सोनवणे, जिल्हाध्यक्ष सुरेश शिंदे,अली अकबर मणेरी, अफजल कुरेशी, युनुस मणेरी, सोहेल तांबोळी, सईद मोमीन यांनी विशेष परिश्रम घेतले, यावेळी प्रकाश पवार,वसीम बागवान तसेच इतर सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी भेटी देऊन लसीकरणासाठी आलेल्या नागरीकांना प्रोत्साहीत केले.