इंदापूर

‘शिवशंभो’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहरात विविध सामाजिक उपक्रम

विधायक कामे करून वाढदिवस साजरा

‘शिवशंभो’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहरात विविध सामाजिक उपक्रम

विधायक कामे करून वाढदिवस साजरा

इंदापूर : प्रतिनिधी
नेहमीच सामाजिक,सांस्कृतिक कामात अग्रेसर असणारे शिवशंभो प्रतिष्ठान चे अध्यक्ष शुभम पवार यांचा वाढदिवस बुधवारी ( दि.२१ ) विविध सामाजिक विधायक कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात येत आहे.

इंदापूर येथील नेताजीनगर ( ४० फुटी रोड ) येथे सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे,त्याच बरोबर मोफत आरोग्य तपासणी शिबीर,गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,अनाथालयास धान्य वाटप,वृद्धांसाठी आधार काठीचे वाटप तसेच गरजू महिलांना साडी वाटप असे विविध सामाजिक उपक्रम सकाळ पासूनच राबविण्यात येत असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

इंदापूर शहरातील उभरते युवा नेतृत्व शुभम पवार यांनी इंदापूर शहरात कोरोनाच्या काळात नागरिकांना सामाजिक बांधिलकी या नात्याने मदतीसाठी धावून येत मदत केलेली आहे.शहरात महापुरुषांची जयंती असेल किंवा विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम असो प्रत्येक वेळी हुरेरीने सहभागी होत मदत करत असतात,त्यामुळे येणाऱ्या दिवसात या युवा नेतृत्वाला शहरातील नागरिकांची सेवा करण्यास संधी नक्कीच मिळेल यात मात्र शंकाच नाही असे मत नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button