गोविंद बागेत दिवाळी पाडव्याच्या स्नेही भेटीचा कार्यक्रम होणार ; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली माहिती
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गोविंद बागेत दिवाळी भेट कार्यक्रम होणार

गोविंद बागेत दिवाळी पाडव्याच्या स्नेही भेटीचा कार्यक्रम होणार ; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली माहिती
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गोविंद बागेत दिवाळी भेट कार्यक्रम होणार
बारामती वार्तापत्र
बारामतीतील गोविंद बागेत दरवर्षी दिवाळीच्या पाडव्यादिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते येत असतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा भेटीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
गोविंद बागेत दरवर्षी हा पाडवा मेळावा पार पडतो. यावेळी राज्यभरातून कार्यकर्ते व पदाधिकारी येतात व कुटुंबाला थेट भेटतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी दिवाळी भेटीचा कार्यक्रम रद्द झाला होता. यावर्षी मात्र पवार कुटुंब या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने भेटणार की नाही अशी उत्सुकता राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना होती. आज शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ही अस्वस्थता दूर करत यावर्षी नेहमीप्रमाणे पाडवा भेट होणार असल्याचे जाहीर केले.
दरम्यान आज पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पाडवा दिवशी नेहमीप्रमाणे होणारी ही भेट यावर्षी मात्र सुरक्षित अंतर ठेवून होणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.