मुंबई

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात; नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

शरण येण्यास दहा दिवसांचा कालावधी न्यायालयाने दिला आहे.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात; नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

 शरण येण्यास दहा दिवसांचा कालावधी न्यायालयाने दिला आहे.

मुंबई – प्रतिनिधी

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे  यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. त्यांना शरण येण्यास दहा दिवसांचा कालावधी न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत  यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अटकेपासून त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांची मुभा दिली आहे आणि तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करता येणार नाहीये.

सर्वोच्च न्यायालयाने आज नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यासोबतच 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर राहण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांत नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर हजर रहावं लागेल. त्यामुळे नितेश राणे हे 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर होऊन नियमित जामीन अर्ज दाखल करु शकणार आहेत. मात्र, अटकपूर्व जामीनाचा मार्ग नितेश राणे यांच्यासाठी बंद झाला आहे.

Related Articles

Back to top button