शिवांशच्या मदतीला धावून आले सत्यजित दादा आणि प्रा. गायकवाड
राहाता येथील राजेंद्र विष्णू सोमवंशी यांच्या आठ महिन्याच्या बाळाला(चि.शिवांश) उपचारासाठी हैदराबाद येथे ‘प्री-अपॉइंटमेंट’ असल्याने वैद्यकीय उपचार घेण्यासाठी वेळेत जाणे आवश्यक होते. परंतु राहाता पोलीस, शिर्डी डी.वाय.एस.पी., अहमदनगर जिल्हा एस.पी. यांचेकडून वारंवार विनंती करुनही हैदराबाद येथे जाण्यासाठी प्रवासी परवानगी मिळत नव्हती, चालढकल सुरु होती. संचारबंदी व लॉकडाऊन चा भोकाडी यामध्ये मानवी मुल्यांनाही ‘कोरोना’ डसल्याचा भास आमचे मित्र तथा शिवांशचे वडील राजेंद्र सोमवंशी यांना झाला.
पोलिसांकडे अर्ज, कागदपत्रांची पूर्तता करूनही राजेंद्र यांच्या पदरी निराशा आली. हताश राजेंद्र याने प्रा.गायकवाड यांच्याशी संपर्क केला, परीस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी प्रयत्न सुरू केले. अनेक पोलीस अधिकारी तथा महसूल विभागातील अधिकारी मित्रांना विचारणा केली असता या अवघड परवानगी पत्रासाठी त्यांनी मुंबईकडे बोट केले.
पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या काही मित्रांना याबाबत सांगितले पण कोरोनाच्या महामारीने या सर्वांना मर्यादा आल्या असल्याचे त्यांना स्पष्ट जाणवले.
वेळ कमी आणि त्यात लॉकडाऊन यामुळे अधिकचा वेळ वाया घालवणे परवडणारे नव्हते. मग त्यांनी थेट युवा नेते तथा महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांच्या कानावर घडलेला प्रकार सांगितला.
सत्यजीतदादांची कार्यालयीन यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली. दर तासाला फॉलोअप, संवाद आणि धीर देणारे शब्द.. यामुळे जीवात जीव आला. मुंबईच्या पोलीस महासंचालक कार्यालयातून दोन तासातच संपूर्ण पूर्तता करुन फोन करण्यात आला. सत्यजीतदादांचे कार्यालयात असणारे योगेश दिवाणे यांनी समन्वय करुन रात्री 11 वाजता शिवांश आणि त्याच्या आई-वडिलांना राहाता ते हैदराबाद प्रवासासाठी परवानगीचे पत्र मिळाले.
सोमवंशी कुटुंबियांची कोणतीही ओळख, परिचय नसताना या अतिशय अवघड परिस्थितीत राहाता तालुक्यातील ‘शिवांश’ला आज मदत मिळाली. याशिवाय ‘हैदराबाद मेडिकल जर्नी’ निर्विघ्न होण्यासाठी सत्यजीतदादांनी एक इमर्जन्सी फोन नंबरही सोमवंशी कुटुंबाला दिला आहे.
प्रा. जयंत गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचारी तथा गरजूंना स्व खर्चाने अन्न पुरवठा केला होता, कोरोना काळातील परीस्थिती बघता नागरीक नातेवाईकांनाही मदतीसाठी सरसावत नसताना एका प्राध्यापकाच्या कार्याला सलाम पुढेही कुणाला मदत हवी असल्यास त्यांच्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. जयंत गायकवाड
शिर्डी विधानसभा मतदारसंघ