स्थानिक
शिवाजी चौकातील रस्त्याची दुरुस्ती व्हावी:नागरिकांची मागणी.
पाउसाच्या पाण्याने अपघात होण्याची शक्यता.
शिवाजी चौकातील रस्त्याची दुरुस्ती व्हावी:नागरिकांची मागणी.
पाउसाच्या पाण्याने अपघात होण्याची शक्यता.
बारामती:वार्तापत्र
बारामती शहरातील शिवाजी चौक येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे मोट्या प्रमाणावर पडलेले रस्त्याच्या कडेला व मधोमध खड्डे,दगड,गोटे यांचा खच त्यामुळे रस्त्यावरून जाताना अपघात होण्याची शक्यता अधिक आहे चारचाकी व दुचाकी वाहन चालकास वाहने चालविणे कठीण होत आहे तर पायी चालणाऱ्या व्यक्तीस सुद्धा व्यवस्थित चालणे कठीण होत आहे.
पाऊसळ्या मध्ये सदर रस्त्यावरील खड्या मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
तरी प्रशासनाने त्वरित सदर रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.