उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्सव साजरा…
शिवाजी महाराज यांनी शिवनेरी परिसरातील हापूस आंबा जपलेला आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्सव साजरा…
शिवाजी महाराज यांनी शिवनेरी परिसरातील हापूस आंबा जपलेला आहे.
प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केला असून शिवभक्तांनी किल्ले शिवनेरीवर मोठी गर्दी केली आहे. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते
प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवनेरीवर उपस्थित राहणार नाहीत. शिवनेरी किल्ल्यावर राज्य शासनाच्यावतीने शिवजयंती कार्यक्रमाच आयोजन करण्यात येते. आज या ठिकाणी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत.
गडावर पोवाडे तसेच मर्दानी खेळ सादर होत आहेत. शिवजन्मस्थळावर फुलांची छान सजावट करण्यात आली आहे. जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने बाळ शिवाजीचा पाळणा सजवण्यात आला आहे. पारंपारिक वेशभूषा करून आलेल्या महिला शिवजन्माचा पाळणा गाणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री तसेच मान्यवर पाळण्याची दोरी हाती घेऊन बाळ शिवाजीच्या पालण्याला झोका देतील. ‘जय भवानी, जय शिवराय’च्या जयघोषाने संबंध परिसर दुमदुमून गेला आहे.
आम्हाला काही जातीचा अभिमान नाही का ? शिवबांनी काय शिकवलंय : अजित पवार
शिवाजी महाराज यांनी शिवनेरी परिसरातील हापूस आंबा जपलेला आहे
हापूस आंब्याला जीआय टॅग मिळवून देण्याचा प्रयत्न
हापूस आंब्याला मानांकन कसं मिळेल याचा प्रयत्न चाललेला आहे
आरक्षणाच्या संदर्भातील मुद्दा उपस्थित केला
आम्ही सगळ्यांनी विधिमंडळात मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी भूमिका घेतली गेली
न्यायालयात अडचण आली
आयोग स्थापन करुन आरक्षण देण्याचा प्रयत्न केला
मुंबईतील हायकोर्टात आरक्षण टिकलं, सुप्रीम कोर्टात ते फेटाळलं
सुप्रीम कोर्टाची भूमिका 50 टक्के वर आरक्षण नको अशी भूमिका आहे
केंद्र सरकारनं कायदा करुन 50 टक्केवर आरक्षण द्यायला लागेल
मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना अजित पवारांनी सुनावलं
आम्हाला काही.अभिमान नाही का ?
शिवबांनी काय शिकवलंय,
सगळ्या जातींना पुढे घेऊन जायचंय,
कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये,
काही भागात जाट आरक्षण, वेगवेगळ्या भागात वेगवेगळ आरक्षण मागितलं जातं,
आम्ही पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा हा एक मुद्दा होता
पंतप्रधानांनी सांगितलं की चर्चा करून सांगतो
तरुण मुलांच रक्त सळसळ करतं मात्र बारकावे समजून घेतलं पाहिजे
संभाजीराजेंना आवाहन आम्ही एक समिती केलीये
वेगवेगळ्या शिष्टमंडळांना भेटत असतात,
ज्या ज्या समाजाला आरक्षम दीलं आहे त्याला धक्का लागता कामा नये,
हि गोष्ट आम्ही महाराष्ट्रातील जनतेला सांगतो,
काल.रात्री 12 वाजता सर्वांत उंच पुतळा औरंगाबादला.बसला ..
नियमांच पालन करून सर्व परवानगी घेऊन अशा पध्दतीने राज्याची वाटचाल करायची आहे.