नाना पटोलेंनी ‘त्या’ वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन करणार : हर्षवर्धन पाटील
पटोलेंच्या वक्तव्यावर भाजपा आक्रमक

नाना पटोलेंनी ‘त्या’ वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन करणार : हर्षवर्धन पाटील
पटोलेंच्या वक्तव्यावर भाजपा आक्रमक
इंदापूर : प्रतिनिधी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन करणार असल्याचे वक्तव्य माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे.ते मंगळवारी (दि.१८) भाग्यश्री निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
पाटील म्हणाले की, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे वक्तव्य संविधानिक नसून निषेधार्ह आहे. वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये प्रधानमंत्री हे पद सर्वोच्च मानलं जातं त्याचा मान ठेवणं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे सर्वच राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असते परंतु प्रधानमंत्री यांच्याबद्दलच्या ‘त्या’आक्षेपहार्य विधानाचा निषेध करतो.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रधानमंत्री यांची माफी मागावी. अन्यथा निश्चितपणे भारतीय जनता पक्ष तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. पुढील काळात अशी वक्तव्य होणार नाहीत याची वरिष्ठ पातळीवर सर्व प्रमुखांनी नोंद घ्यावी.
काय प्रकरण आहे ?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये नाना पटोले हे मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असे वक्तव्य करताना दिसत आहेत.त्यामुळे त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून भाजपा चे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.