शेतकरी अभ्यास दौरा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी फायदेशीर : अंकिता पाटील ठाकरे
बावडा लाखेवाडी गटातील ३० शेतकऱ्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठास भेट
शेतकरी अभ्यास दौरा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी फायदेशीर : अंकिता पाटील ठाकरे
बावडा लाखेवाडी गटातील ३० शेतकऱ्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठास भेट
इंदापूर : प्रतिनिधी
बावडा लाखेवाडी गटातील ३० शेतकऱ्यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या माध्यमातून व पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागा मार्फत मोफत शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या संदर्भात बोलताना अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की,शेती क्षेत्रातील नवनवीन बदल, तंत्रज्ञान, शास्त्रीय व शाश्वत शेती करण्याच्या उद्देशाने तसेच नवे काही करण्याची प्रेरणा मिळावी,शेतकऱ्यांच्या विकासात्मक बुद्धीला वाव देण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.हा शेतकरी अभ्यास दौरा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरणार आहे.
पारंपरिक शेतीमध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा विविध प्रकारे वापर करता येतो. परंतु त्यातील ज्ञान नसल्यामुळे आम्हाला खूप अडचणी येत होत्या परंतु जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी आमच्यासाठी मोफत शेतकरी अभ्यास दौऱ्याचे नियोजन करून आम्हाला अत्याधुनिक शेती करण्यासाठी लागणारी माहिती मोफत रित्या उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.
माणिक बाप्पू खाडे
शेतकरी, भोंडणी