शेतकरी कामगार बेरोजगार अपंग हक्क परिषद च्या मागणीला यश.
शिक्षण विभागाने घेतली दखल.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काम धंदे बंद असल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प होते पालकांच्या हाताला काम नव्हते अशातच काही शैक्षणिक संस्थांनी शाळांनी फीच्या संदर्भात तगादा लावल्याचे आढळून आले होते त्यामुळेच पालकांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले होते यातून पालकांची आर्थिक मुस्कटदाबी होत होती.
त्यामुळे शेतकरी कामगार बेरोजगार अपंग हक्क परिषदेचे अध्यक्ष सागर मिसाळ यांच्याकडून लेखी निवेदन शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
त्याची दखल घेत सद्यस्थितीत जीवन पूर्वपदावर येईपर्यंत शाळेने अथवा संस्थेने फी भरण्यासंदर्भात पालकांना कोणतेही मेसेज देऊ नयेत.
शाळेने फी भरणेबाबत पालकांना तगादा लावल्याचे निदर्शनास आल्यास अथवा तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळेविरुद्ध उचित कार्यवाही प्रस्तावित करणेबाबत वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात येईल अशा सूचना गट शिक्षणाधिकारी यांनी काढलेल्या पत्रकातुन देण्यात आलेल्या आहेत.