इंदापूर

हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा च्या वतीने इंदापूर तहसील कार्यालयावर महाविकास आघाडी व लोकप्रतिनिधींच्या विरोधात निषेध मोर्चा

लोकप्रतिनिधींवर केले गंभीर आरोप

हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा च्या वतीने इंदापूर तहसील कार्यालयावर महाविकास आघाडी व लोकप्रतिनिधींच्या विरोधात निषेध मोर्चा

लोकप्रतिनिधींवर केले गंभीर आरोप

इंदापूर:-बारामती वार्तापत्र 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध मोर्चा आज दि. 12 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती ते तहसिल कार्यालय असा काढण्यात आला.

कोविड-19 परिस्थिती, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना, अवैद्य बेकायदेशीर धंदे, इंदापूर तालुक्यातील रस्त्याची झालेली दुर्दशा, आरक्षण, मंदिरे तसेच इतर बाबतीत महाविकास आघाडी तसेच तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांना परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असून सर्वसामान्य जनता ,शेतकरी, कामगार, मजूर यांच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या तालुक्यांमध्ये बेकायदेशीरपणे अनेक गोष्टी चालू असून एमआयडीसी मधून हजारो ट्रक आणि ट्रॅक्टर मुरूम व काळी माती जात आहे,त्याची रॉयल्टी कोण भरणार असा सवालही यावेळी पाटील यांनी उपस्थित केला.तसेच तालुक्यामध्ये स्टोन क्रशर किती आहेत या तालुक्यात परवानग्या कशा दिलेल्या आहेत,एकाला एक नियम बाकीच्यांना वेगळा नियम हे इथून पुढे चालणार नाही असे म्हणत कोविड काळात सरकार म्हणते घरात रहा आपले मंत्री म्हणतात घरमोडा असा आरोप ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्र्यांवर नाव न घेता केला.तसेच शेतकऱ्याच्या शेतातील पंचनामा करण्या ऐवजी सरकारचा पंचनामा करण्याची वेळ आलेली आहे अशी जहरी टीका पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर करत भाषणाअंती विविध मागण्यांच्या संदर्भातील निवेदन तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी इंदापूर भाजपा तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार, शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद,माजी सभापती मयूरसिंह पाटील, भाजप किसान मोर्चा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख माऊली चवरे,जेष्ठ नेते मारुतराव वनवे,माजी सभापती प्रदीप पाटील,पुणे जिल्हा सचिव तानाजीराव थोरात,दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील,वाहतुक संघाचे अध्यक्ष रघुनाथ राऊत,गटनेते कैलास कदम,पुणे जिल्हा कुस्तिगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके,उपनगराध्यक्ष धनंजय पाटील,युवानेते अमोल इंगळे,संचालक दादा पिसे,युवा मोर्चा अध्यक्ष राम आसबे,अनुसुचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटनीस सचिन आरडे,सचिन सावंत,राजकुमार जठार,अँड.आसिफ बागवान,चाँद पठाण,गणेश घाडगे,यांसह शेकडो कार्यकर्ते दाखल झाले होते.

Related Articles

Back to top button