इंदापूर

मुंबई-पुणे नको आत्ता इंदापूरच्या स्मेअर पॅथॉलॉजी मध्ये होणार सर्व चाचण्या व निदान

इंदापूरमध्ये आद्यवत पद्धतीच्या लॅबची निर्मिती

मुंबई-पुणे नको आत्ता इंदापूरच्या स्मेअर पॅथॉलॉजी मध्ये होणार सर्व चाचण्या व निदान

इंदापूरमध्ये आद्यवत पद्धतीच्या लॅबची निर्मिती

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर शहर व तालुक्यात प्रथमच अद्यावत पद्धतीची स्मेअर पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे सर्व चाचण्या व योग्य निदान काही वेळातच होणार आहे.

या अगोदर रुग्णांना काही ठराविक चाचण्या सोडल्या तर इतर विविध प्रकारच्या चाचण्यांकरिता पुणे,सोलापूर, मुंबई अशा ठिकाणी जावे लागत होते.या सर्व प्रक्रियेसाठी बराच कालावधी लागत असल्याने रुग्णांवर योग्य वेळी योग्य पद्धतीचे उपचार होत नसत परंतु आत्ता हीमॅटोलोजी, बायोकेमिस्ट्री, क्लीनिकल पॅथॉलॉजी, मायक्रो बायॉलॉजी, हिस्ट्रो पॅथॉलॉजी, मौलीक्लुअर असे स्वतंत्र,सुसज्ज व अत्याधुनिक कार्यप्रणालीवर आधारित लॅब या ठिकाणी उपलब्ध आहेत.

ग्रामीण भागातील रुग्णांवर योग्य वेळी योग्य असे उपचार व्हावेत,अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने डॉ. मेघा अडसूळ,प्रदीप जाधव, शुभम गंगावणे, अनिल पवार, प्रकाश जाधव, अभिषेक शेंडगे यांच्या माध्यमातून सदरील लॅब उभा राहिली असून या ठिकाणी डॉ. मेघा अडसूळ (एम.डी पॅथॉलॉजिस्ट),डॉ. कुलदीप पवार (एम.डी पॅथॉलॉजिस्ट), डॉ. लक्ष्मण कराळे (एमबीबीएस, डी.सी.पी), डॉ. लक्ष्मण देवकाते (एम.डी पॅथॉलॉजिस्ट), डॉ. स्वप्नील पाटील (एम.डी पॅथॉलॉजिस्ट) या तज्ञ डॉक्टरांसह अनुभवी व प्रशिक्षित कामगार वर्गाच्या मदतीने योग्य व माफक दरात सर्व चाचण्यांचे निदान करण्यात येणार आहे.

इंदापूर शहरातील बाबा चौक या ठिकाणी दिमाखात उभी असणाऱ्या या स्मेअर पॅथॉलॉजी लॅब ला लवकरच एनएबीएल ची मान्यता मिळणार असून आरटीपीसीआर बरोबरच सर्व प्रकारच्या पीसीआर चाचण्या या ठिकाणी होतील अशी माहिती डॉ. मेघा अडसूळ यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button