मुंबई

शेतकऱ्यांना पीक विमा देताना नाहक त्रास देत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही ;उपमुख्यमंत्री सज्जड दम

नांदेडमध्ये पीक विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याचा बेजाबदारपणा समोर आलाय.

शेतकऱ्यांना पीक विमा देताना नाहक त्रास देत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही ;उपमुख्यमंत्री सज्जड दम

नांदेडमध्ये पीक विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याचा बेजाबदारपणा समोर आलाय.

मुंबई :प्रतिनिधी

शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांना दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत. या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी सध्या ऐकायला मिळत आहेत. अशावेळी अजित पवार यांनी विमा कंपनींच्या प्रतिनिधींना इशारा दिलाय.

राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्यसरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसतेय त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असेही अजित पवार यांनी सांगितले. आम्ही वेडंवाकडं करा असं काही सांगत नाही. पण ज्या नुकसानीमुळे बळीराजाला… कास्तकऱ्याला पीक विमा मिळू शकतो, तो मिळाला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

Back to top button