कृषी

शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा नवा अध्यायः निर्यातक्षम शेतीची नवी दिशा

कार्यक्रमात १५० जास्त शेतकरी सहभाग नोंदीला.

शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा नवा अध्यायः निर्यातक्षम शेतीची नवी दिशा

कार्यक्रमात १५० जास्त शेतकरी सहभाग नोंदीला.

बारामती वार्तापत्र 

कृषी विज्ञान केंद्र, बारामती व कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील संधी, गुणवत्ता मानके व आवश्यक कागदपत्रे व निर्यातीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणे हा होता. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील.

या प्रशिक्षणामध्ये सुरुवातीला श्री यशवंत जगदाळे प्रकल्प प्रमुख, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, बारामती यांनी निर्यातीसाठी फळे व भाजीपाला उत्पादन विषमुक्त करताना काय काळजी घेतली पाहिजे व उत्तम कृषी पद्धतीची माहिती दिली.

श्री पी. ए. बामणे, वरिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक, APEDA, मुंबई यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना निर्यातीसाठी लागणारी सर्व प्रमाणपत्रे, शेतीमाल गुणवत्ता व्यवस्थापन व APEDA च्या ज्या काही निर्यासंबंधी योजना आहेत याची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात १५० जास्त शेतकरी सहभाग नोंदीला व शेवटी उपस्थित शेतकरी बांधवांचे आभार सौ. सुनिता सावंत, सहाय्यक व्यवस्थापक, APEDA, मुंबई यांनी मानले.

Related Articles

Back to top button