शेतकऱ्यांना शक्य तितकी जास्त मदत करणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
इंदापूरच्या कृषी महोत्सवाचा समारोप
शेतकऱ्यांना शक्य तितकी जास्त मदत करणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
इंदापूरच्या कृषी महोत्सवाचा समारोप
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूरात कृषी उत्पत्र बाजार समितीच्यावतीने आयोजित भव्य कृषी जनावरे प्रदर्शन घोडेबाजार व डॉग शो या पाच दिवसीय ‘इंदापूर कृषी महोत्सव 2025 च्या समारोपप्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार यशवंत माने, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, उपविभागीयकृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर चुके आदी उपस्थित होते.
या वेळी अजित पवार म्हणाले, शेतकरी संशोधक असला पाहिजे. शेतीत प्रगती साधण्याच्या दृष्टीने शेतकऱ्याने शास्वशास्रारखा विचार केला पाहिजे. प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांनानवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होते. त्यादृष्टीने नवीन माहिती, तंत्रज्ञान यासोबतच जातिवंत जनावरांची ओळख इंदापूर बाजार समिती करत आहे, ही समाधानाची बाब आहे. या बाजार समितीला शेतकरी निवास उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, पुणेजिल्ह्यातील एकमेव घोडेबाजार या ठिकाणी पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील देशातील दोनशे प्रकारची जातिवंत घोडे वैशिष्टयपूर्ण डॉग शो, खिलार जनावरे, बैल, गाई या ठिकाणी पाहायला मिळाले.
इंदापूर तालुक्यातील शेतकरी डाळिंब, केळी, पेरू, द्राक्षे, ड्रॅगन फ्रूटआदी फळबागांत अग्रेसर आहे. येथील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे द्राक्षाचे वाण तयार केले आहेत. हे पाहता शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे. शेतीत कृत्रिम बुद्धिमतेचा वापर, पिकाला माफक पाणी देण्याची पद्धत, उसाचे उत्पादनवाढविणे, चांगल्या प्रकारची फुले, फळे कशी पिकवावीत याबाबतचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. आपल्याकडे शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, इतर राज्यातील, देशातील तंत्रज्ञान आणावे लागेल, अशी सूचनाही पवार यांनी केली.
“राधा”ने वेधले लक्ष
•प्रदर्शनात सहभागी झालेल्या जगातील सर्वांत बुटक्या राधा नावाच्या म्हशीने अजित पवार बांचे लक्ष वेधले. या वेळी त्यांनी मोठ्या उत्सुकतेने म्हशीबावतची जनातील सवा जनावरांचे प्रदर्शन, घोड्यांची माहिती जाणून घेतली. शर्यंत, डॉग शो पाहिला आणि वातील उत्कृष्ट ठरलेल्या जनावरांच्या मालकांना बक्षिसे वितरित केली.