श्रीनगर येथील राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीचा हर्षवर्धन भोसले ची भरारी
एकूण ३० खेळाडू या स्पर्धेत खेळत
श्रीनगर येथील राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीचा हर्षवर्धन भोसले ची भरारी
एकूण ३० खेळाडू या स्पर्धेत खेळत
बारामती वार्तापत्र
दि. १६ ते २१ दरम्यान श्रीनगर येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र टीम ने सहभाग नोंदवला या मध्ये हर्षवर्धन भोसले यांनी सुवर्णपदक मिळवले.
सदर स्पर्धे मध्ये बारामतीच्या १२ खेळाडूंची निवड महाराष्ट्र टीम मध्ये झाली होती. महाराष्ट्र मधील एकूण ३० खेळाडू या स्पर्धेत खेळत होते. ही स्पर्धा शेर ये काश्मीर इंडोर स्टेडियम श्रीनगर या ठिकाणी संपन्न झाली.
या स्पर्धेत भारत देशातून एकूण २२ राज्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यात बारामतीच्या हर्षवर्धन भोसले, ओमराजे चोपडे, वेदांत गलांडे, द्विज कांबळे, पार्थ गावडे, ऋषिकेश जाधव, वैष्णवी गुळवे, प्रज्ञा बनसोडे, ऋतुजा बोडरे, श्रेया गरजे, यशश्री माने अनुष्का गवळी इत्यादी खेळाडूंची निवड महाराष्ट्र टीम मध्ये झाली होती.
या स्पर्धेत हर्षवर्धन भोसले याने जम्मू कश्मीर च्या खेळाडू सोबत कडवी झुंज देत पहिले गोल्ड महाराष्ट्र संघच्या नावे केले, तसेच ऋषिकेश जाधव हरियाणा सोबत लडला तर पार्थ गावडे याने केरळच्या खेळाडूला असमान दाखवत आपल्या नावे ब्रॉन्झ पदक नोंदविले त्यातच मुलींच्या श्रेया गरजे व अनुष्का गवळी यांनी पंजाब, आसाम, मणिपूर च्या टीम वर विजय मिळवीत ब्रॉन्झ पदक आपल्या नावे केले. हर्षवर्धन भोसले याची निवड दुबई येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियान स्पर्धे साठी या स्पर्धेतून झाली आहे.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ जम्मू व काश्मीर चे स्पोर्ट्स कौन्सीला यांच्या हस्ते झाला. तसेच इंडियन पिंच्याक सिलाट चे अध्यक्ष किशोर येवले सेक्रेटरी मोहमद इकबाल, कोम्पिटेशन डायरेक्टर इरफान sir यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेत महाराष्ट्र टीम कोचं श्री. अंशुल कांबळे यांनी व टीम मॅनेजर म्हणून साहेबराव ओहोळ यांनी काम पाहिले
महाराष्ट्र टीम मधील सिलेक्ट झालेले सर्व खेळाडू बारामती मधील योद्धा स्पोर्ट्स अकॅडमी ला प्रॅक्टिस गेली बरा वर्ष करत आहेत. या सर्व खेळाडूंना अमृत मालगुंडे, रुद्र नाले,आदित्य आटोळे, स्नेहल झिरपे, दिनेश तावरे यांनी साहेबराव ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले आहे.