श्रीराज भरणे व अनिकेत भरणे युवा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित
कोरोना काळातील उल्लेखनीय कामाबद्दल गुणगौरव

श्रीराज भरणे व अनिकेत भरणे युवा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित
कोरोना काळातील उल्लेखनीय कामाबद्दल गुणगौरव
इंदापूर :प्रतिनिधी
कोविड काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल युवा नेते श्रीराज दत्तात्रय भरणे यांना रविवारी (दि.२२) भिगवण येथे धनाजीराव थोरात मित्र परिवार यांच्यावतीने युवा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्यावतीने श्रीराज भरणे व अनिकेत भरणे यांनी कोविड काळात अनेक रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे,प्लाझ्मा मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.आयसोलेशन बेड कमी पडू नयेत यासाठी पूर्वतयारी म्हणून श्रीराज भरणे यांनी स्वतः पुढाकार घेत इंदापूर येथील विद्याप्रतिष्ठान मध्ये कोविड सेंटरची निर्मिती केली.कोविड काळात गोरगरिबांना अन्नधान्याचे कीटवाटप केले,रक्तदान शिबिरे घेतली.त्यांनी आरोग्यसेवा देण्यासाठी युवकांची मजबूत फळी तयार केली त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल धनाजीराव थोरात मित्र परिवार व भिगवण परिसरातील नागरिकांच्या वतीने श्रीराज भरणे यांना युवा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना सन्मानपत्रही देण्यात आले.यावेळी भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत भरणे यांचाही कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना श्रीराज भरणे म्हणाले की,हा पुरस्कार माझा नव्हे तर कोरोना काळात काम केलेल्या युवकांचा आहे.सर्वांनी एकत्रित येऊन काम केल्याशिवाय यश मिळत नाही.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष धनाजीराव थोरात, पोंधवडीचे सरपंच लक्ष्मण पवार,शामराव आढाव,सतिश शेळके,डिकसळचे माजी सरपंच रावसाहेब गवळी, पोलिस पाटील संदीप पवार,श्रीनिवास शेलार,सौरभ शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.सन्मान पत्राचे वाचन डॉ.काशिनाथ सोलनकर यांनी केले.प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष धनाजीराव थोरात यांनी केले.आभार नानासाहेब मारकड यांनी मानले.