श्रीलंकेत हिंसाचार; राजपक्षेंच्या घराला लावली आग, खासदाराचा मृत्यू ; वाचा महत्त्वाचे मुद्दे
या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
श्रीलंकेत हिंसाचार; राजपक्षेंच्या घराला लावली आग, खासदाराचा मृत्यू ; वाचा महत्त्वाचे मुद्दे
या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रतिनिधी
श्रीलंकेची आर्थिक स्थिती संपूर्ण ढासळली आहे. अखेर या ढासळणाऱ्या स्थितीला सावरण्यात पंतप्रधान महिंदा राजपक्षे अपयशी ठरले. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीमाना दिला आहे. राजीनाम्यानंतर श्रीलंकेची स्थिती अधिक भयावह झाली आहे. संतप्त जमावाने श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांचे घर जाळून टाकले आहे. श्रीलंकेत झालेल्या हिंसाचारात अनेक जण ठार झाले. तर एका खासदाराचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेतील हिंसाचारात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यृ झाला असून सुमारे 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिंसाचार झालेल्या परिसरात पोलिसांनी कर्फ्यू लागू केला होता. हा कर्फ्यू मंगळवारी सकाळी 7 वाजता उठवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कोलंबोच्या पश्चिम प्रांतात सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी या भागात कर्फ्यू लावला होता.
खासदाराची हत्या!
श्रीलंकेतील हिंसाचार इतका टोकाला गेला आहे तिकडे एका खासदाराचा मृत्यू झाला आहे . श्रीलंका पोदुजामा पेरामुनाचे (SPP) खासदार अमरकिर्ती अतुकोराला यांना पोलोन्नाकरुआ जिल्ह्यात सरकारविरोधी गटाकडून घेरण्यात आलं. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून खासदाराने पळ काढला. त्यांनी एका इमारतीमध्ये आश्रय घेतला. मात्र तिकडे संपूर्ण जमाव पोहोचल्यानंतर तिकडे खासदाराचा मृतदेह आढळून आल्याचं कळतं.
खासदारांच्या घरावर सुद्धा हल्ला
श्रीलंकेतील खासदार सनथ निशांतआणि जॉन्सन फर्नांडो यांचे घर देखील जमावाने आगीच्या हवाली केल्याची माहिती मिळतेय. महिंदा राजपक्षे समर्थक राजधानी सोडून पळ काढत आहे. नेते मंडळींच्या गाड्या अनेक ठिकाणी आडवल्या जात आहेत. देशातली महत्त्वाच्या शहरात हिंसाचार उफाळला आहे. संपूर्ण देशात संचारबंदी लागू केल्यानंतर अवघ्या काही तासांतच हिंसाचाराने रौद्र रुप धारण केलं.
श्रीलंकेतील सध्याची परिस्थितीबाबत 10 महत्त्वाचे मुद्दे
1. श्रीलंकेतील हमताबनटोटा येथील महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आंदोलकांनी आग लावली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्यतिरिक्त काही मंत्र्यांची घरालाही आग लावल्याची आणि तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
2. श्रीलंकेत हिंसाचार भडकल्यानंतर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला. हिंसाचारात श्रीलंकेच्या खासदारासह पाच जणांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
3. श्रीलंकेतील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त जनतेकडून गेल्या अनेक आठवड्यांपासून निदर्शनं सुरू होती. जेव्हा सरकारकडे आयातीसाठी निधी संपला तेव्हा मात्र लोक रस्त्यावर उतरले आणि हिंसाचार पसरला. जनतेचा रोष पंतप्रधान राजपक्षे आणि त्यांच्या समर्थकांवर आहे.
4. श्रीलंकेतील सर्व शहरांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हिंसाचार रोखण्यासाठी पोलीस आंदोलकांवर अश्रुधुराचा आणि बळाचा वापर करत आहेत. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं दिसत असून आंदोलकांची संख्याही वाढत चालली आहे.
5. भारताचे श्रीलंकेतील घडामोडींवर बारकाईनं लक्ष आहे. दरम्यान, कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तांनी भारतीयांना संकटात मदतीसाठी आपत्कालीन मोबाईल क्रमांक +94-773727832 जारी केला आहे. तसेच, श्रीलंकेत उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांना कोणत्याही आवश्यक मदतीसाठी cons.colombo@mea.gov.in आणि cons2.colombo@mea.gov.in सोबत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
6. श्रीलंका 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंतच्या सर्वात गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे हे संकट उद्भवलं आहे. यामुळे श्रीलंकेकडे मुख्य अन्नपदार्थ आणि इंधनाच्या आयातीसाठी पैसे नाहीत.
7. खासदाराच्या मृत्यूबाबत पोलिसांनी सांगितले की, श्रीलंकेचे पोदुजाना पेरामुना (SLPP) खासदार अमरकिर्ती अतुकोरा (वय 57 वर्ष) यांना पोलोनारुआ जिल्ह्यातील पश्चिमेकडील नितांबुआ शहरात आंदोलकांनी घेरलं. त्यांच्या कारमधून गोळी झाडण्यात आल्याचा दावा लोकांनी केला आहे. संतप्त जमावाने त्यांना कारमधून बाहेर काढल्यावर त्यांनी पळ काढला आणि एका इमारतीत आश्रय घेतला. यानंतर त्यांनी स्वत:वर गोळा झाडत आत्महत्या केल्याचा दावा लोकांनी केला आहे.
8. माजी मंत्री जॉन्सन फर्नांडो यांच्या कुरुणेगाला आणि कोलंबो येथील कार्यालयांवर संतप्त जमावानं हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यांच्या बारला आग लावण्याचीही माहिती समोर आळी आहे. माजी मंत्री निमल लांजा यांच्या निवासस्थानावरही हल्ला करण्यात आला, तर महापौर समनलाल फर्नांडो यांच्या निवासस्थानालाही आग लावण्यात आली आहे.
9. याआधी जनतेला आवाहन करताना अध्यक्ष गोटाबाया म्हणाले की, ‘मी जनतेला संयम बाळगण्याचं आवाहन करतो. हिंसाचाराने केवळ अधिक हिंसाचार पसरेल. आर्थिक संकटाचं निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.’
10. दरम्यान, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन एअरलाइन्सने प्रवाशांना बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर (BIA) पोहोचण्यासाठी त्यांची तिकिटे आणि पासपोर्ट चेकपॉईंटवर दाखवण्याची विनंती केली आहे.