श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा
कै.ह.भ.प.भगवानराव बाबुराव तावरे यांनी बारा वर्षा पूर्वी स्वखर्चचाने मंदिराची उभारणी केली होती .

श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा
कै.ह.भ.प.भगवानराव बाबुराव तावरे यांनी बारा वर्षा पूर्वी स्वखर्चचाने मंदिराची उभारणी केली होती .
बारामती वार्तापत्र
बारामती: श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. हा आनंदोत्सव सर्वत्र साजरा केला जातो. गेल्या बारा वर्षापासून भिगवण रोडवरील श्रीरामनगर येथील श्रीराम मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.
दि.23 ऑगस्टला अखंड हरीनाम सप्ताहची सुरवात हरी विजय ग्रंथ वानाने करण्यात आली. दरम्यानच्या काळात जागर,भजन, कीर्तन इ. धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. दि.30 ऑगस्टला रात्री 12 वाजता कृष्ण जन्माचा कार्यक्रम भजन, फुले टाकून व पाळणा म्हणून आनंदात करण्यात आला. दि.31 ऑगस्टला दुपारी ह.भ.प.जाधव यांचे कल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. महाप्रसादचे आयोजन ह.भ.प.सिंधूताई तावरे यांनी केले होते.
कै.ह.भ.प.भगवानराव बाबुराव तावरे यांनी बारा वर्षा पूर्वी स्वखर्चचाने मंदिराची उभारणी केली होती तेव्हा पासुन श्रीराम जन्म उत्सव व श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम होत असतो असे ऍड.हरीष तावरे यांनी सांगितले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश तावरे, सचिन क्षीरसागर,बाळासाहेब तावरे, आबा सोनटक्के, मोहन निकम, घाडगे महाराज व महिला मंडळाने अथक परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम शासनाने घालून दिलेल्या कोविड-19 च्या नियमांचे तंतोतंत पालन करून करण्यात आला.