श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती येथे कर्मवीर जयंती उत्साहात साजरी
कर्मवीर जीवन चरित्र ऑनलाइन चाचणी चे उद्घाटन मा.डाॅ.मुरूमकर यांनी केले.

श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती येथे कर्मवीर जयंती उत्साहात साजरी
कर्मवीर जीवन चरित्र ऑनलाइन चाचणी चे उद्घाटन मा.डाॅ.मुरूमकर यांनी केले.
बारामती वार्तापत्र
आज दिनांक 22 सप्टेबर 2021 रोजी श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 134 वी जयंती ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली या जयंतीच्या निमित्ताने विद्यालयांमध्ये माननीय श्री सदाशिव बापू सातव अध्यक्ष स्थानिक स्कूल कमिटी, सौ.पौर्णिमाताई तावरे नगराध्यक्ष बारामती नगरपरिषद व मा.प्रा. डॉ. चंद्रशेखर मुरूमकर टी.सी.काॅलेज बारामती मा. श्री दिलीप नाना ढवाण पाटील सदस्य स्थानिक स्कूल कमिटी इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी विज्ञान शिक्षिका सौ.तृप्ती कांबळे यांच्या संकल्पनेतून सर्व महिला शिक्षिकांच्या सहकार्यातून काढलेल्या करोना जनजागृती रांगोळीचे प्रदर्शन मा.श्री सदाशिवबापू सातव यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सौ.तृप्ती कांबळे यांनी तयार केलेल्या कर्मवीर जीवन चरित्र ऑनलाइन चाचणी चे उद्घाटन मा.डाॅ.मुरूमकर यांनी केले. विद्यार्थी मनोगत मृणाल पवार हिने केले व कर्मवीरांविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश साळुंके यांनी मार्गदर्शन केले, तसेच उपप्राचार्य विष्णू बाबर ,पर्यवेक्षक अविनाश साळुंके उपस्थित होते.गोरख तावरे व रोहिणी टेके यांनीसूत्रसंचालन केले कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी मा. श्री गणपत तावरे यांनी मानले.कार्यक्रमास सर्व शिक्षक व सेवकवृंद उपस्थित होते.