श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनि. कॉलेज,बारामती येथे बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
कोविड १९ च्या नियमांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनि. कॉलेज,बारामती येथे बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
कोविड १९ च्या नियमांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची स्त्री शिक्षणाच्या प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी २०२२ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्या मंदिर या प्राथमिक विभागाच्या इ.४ थीच्या विद्यार्थिनींनी बालिका दिना निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये त्यांच्या जीवनावर एक नाटिका सादर केली व सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती सांगितली तर माध्यमिक विभागाच्या इ.10 वी च्या या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शिक्षक मनोगतामध्ये विद्यालयाच्या महिला शिक्षिका सौ.सुनिता कोकरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल माहिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री. पवार बी.एन तसेच उपप्राचार्य श्री.बाबर व्ही.डी व पर्यवेक्षक श्री साळुंके ए.एस उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाची विद्यार्थिनी कु.कोमकर पूजा हिने केले तर कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी श्री. तावरे जी.आर यांनी मानले.कार्यक्रमाचे आयोजन सौ.सातव एस.ए व सौ.चौधर ए.आर यांनी केले. कोविड १९ च्या नियमांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.