इंदापूर

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त इंदापूर सायकल क्लबच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला सहभाग.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त इंदापूर सायकल क्लबच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला सहभाग.

इंदापूर:-प्रतिनिधी
मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांनी भारताला हॉकी खेळत ऑलम्पिक मध्ये तीन वेळा सुवर्णपदक मिळवून दिले तसेच चारशेच्या वर आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत गोल केले. त्यांच्या स्मरणार्थ 29 ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. इंदापूर सायकल क्लब व युवा क्रांती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर शहरातून कोरोना व सायकल अवेरनेस रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सहभाग घेतला. तत्पूर्वी नरुटवाडी येथील मंदिरात सायकल क्लब च्या सदस्यांचा युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने 73 किलोमीटर सायकलिंग केलेल्या तसेच दीडशे किलोमीटर शिंगणापूर रिटर्न सायकलिंग केलेल्या सदस्यांचा युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर सायकल क्लब मध्ये नव्याने सहभागी झालेल्या महिला सदस्यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रास्ताविकपर भाषणात युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सिताप यांनी सायकल क्लबमधील सदस्यांचा सत्कार आयोजनाची आवश्यकता विशद करून युवा क्रांती प्रतिष्ठान राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाबद्दल माहिती दिली. इंदापूर सायकल क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुनील मोहिते यांनी सायकल क्लबची स्थापना, उद्देश, क्लबच्यावतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी युवा क्रांती प्रतिष्ठान व सायकल क्लबच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले. तसेच उपस्थितांना सायकलिंग करण्यासंदर्भात आवाहन केले. निरोगी आयुष्य जगण्यासाठी व कोरोना पासून दूर राहण्यासाठी चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे, योगा असे विविध व्यायाम प्रकार करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

याप्रसंगी इंदापूर येथील तेजस्विनी उकिरडे या विद्यार्थिनीला परदेशातील उच्च शिक्षणासाठी मदत म्हणून भरणे कुटुंबीयांकडून 50 हजार रुपयाची मदत देण्याचे जाहीर केले. तसेच पियुष बोरा, धरमचंद लोढा, मिलिंद कौलगी, महादेव लोखंडे इत्यादींच्या वतीने मदतीचे चेक देण्यात आले. दीर्घ पल्ल्याचे सायकलिंग केल्याबद्दल सुनील मोहिते, प्रशांत सीताप, दशरथ भोंग, रमेश शिंदे, अस्लम शेख, चांद पठाण, मेहबूब मोमीन, स्वप्नील सावंत,संजय गायकवाड, मेजर सोमवंशी,अनिल जाधव,डॉ. उदय कुरुडकर व डॉ. लक्ष्मण सपकळ,डॉ. पंकज गोरे, डॉ.संजय शिंदे, डॉ.ऋषिकेश गार्डे,स्वप्नील गलांडे, प्रतीक रेडके,अवधूत पाटील,उमेश राऊत,ज्ञानदेव डोंगरे, सिद्धार्थ वाघमारे,आदित्यराज मोहिते इत्यादींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आनंद देशपांडे, तुकाराम बानकर, कुशल कोकाटे, सचिन परबते, बाळासाहेब वेदपाठक, प्रितेश भरणे,विनायक वाघमारे इत्यादींचे सहकार्य लाभले. रमेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कुशल कोकाटे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!