संजय गांधी निराधार,श्रावणबाळ व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेची ४७४ प्रकरणे मंजूर
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ यांनी दिली माहिती
संजय गांधी निराधार,श्रावणबाळ व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेची ४७४ प्रकरणे मंजूर
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ यांनी दिली माहिती
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर प्रशासकीय भवन येथे बुधवारी (दि.३०) तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेत संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती योजनेची एकूण ४७४ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ यांनी दिली.तसेच राज्यात सर्वाधिक प्रकरणे इंदापूर तालुक्यात मंजूर करण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सदरील योजनांकरिता एकूण ४८४ प्रस्ताव संबंधित कार्यालयाकडे आले होते.त्यांची पडताळणी करून ४७४ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत तर कागदपत्रांची योग्य पूर्तता नसल्याने १० प्रकरणे नामंजूर झाली आहेत.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य हनुमंत कांबळे, रेहना मुलाणी, लक्ष्मण परांडे, महादेव लोंढे, नितीन शिंदे, दत्तात्रय बाबर, अजय भिसे, प्रमोद भरणे,आबासाहेब निंबाळकर, प्रशासकीय अधिकारी शरद जगताप आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.