संजय गांधी निराधार योजना ठरतेय गोरगरीबांना जीवनदायी : सागर मिसाळ
संजय गांधी निराधार योजनेची ११९ प्रकरणे मंजूर
संजय गांधी निराधार योजना ठरतेय गोरगरीबांना जीवनदायी : सागर मिसाळ
संजय गांधी निराधार योजनेची ११९ प्रकरणे मंजूर
इंदापूर : प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजनेची मासिक सर्वसाधारण सभा इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी ( दि.१४ ) इंदापूर तहसील कचेरी येथे संपन्न झाली. या मासिक सभेत संजय गांधी निराधार योजनेची ११९ प्रकरणे मंजूर करण्यात आली.या योजनेद्वारे लाभार्थ्यांना आर्थिक आधार म्हणून दरमहा एक हजार ते बाराशे रुपये मदत मिळणार आहे.
सदरील योजनेचा प्रमुख उद्देश हा निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठे आजार, घटस्फोटीत स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादींना आर्थिक मदत करणे हा असून या वर्षभरात शेकडो प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.याचे मनोमनी समाधान असल्याचे यावेळी बोलताना श्री. मिसाळ यांनी सांगितले.
पुढे बोलताना मिसाळ म्हणाले की, संजय गांधी निराधार योजना गोरगरिबांसाठी जिवनदायी ठरत असून वय वर्षे ६५ पेक्षा वरील,दारिद्र्य रेषेखालील आणि ज्या कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१ हजार पर्यंत आहे.अशा व्यक्तींना सदरील योजनेचा लाभ मिळत आहे.ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचा संजय गांधी योजनेतील सर्व सदस्यांचा एकमेव उद्देश आहे.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार प्रियंका वैयंकर, पंचायत समितीचे अधिकारी शरद जगताप,संगोयाचे सदस्य हनुमंत कांबळे, प्रमोद भरणे, रहेना मुलाणी, महादेव लोंढे, दत्तात्रेय बाबर, आबासाहेब निंबाळकर, लक्ष्मण परांडे आदी उपस्थित होते.